---Advertisement---

बाबो! मयंकने नॅथन लायनच्या चेंडूवर मारलेला तो षटकार गेला ‘इतका’ लांब, पाहा व्हि़डिओ

On: रविवार, जानेवारी 17, 2021 11:58 AM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालितील चौथा आणि शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाच्या पहिल्या ५ फलंदाजांनी चांगल्या सुरुवातीनंतर आपल्या विकेट गमावल्या. यात मंयक अगरवालचाही समावेश आहे. असे असले तरी मयंकने त्याच्या खेळी दरम्यान एक शानदार षटकार ठोकला. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मयंकने ७५ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकर आणि १ षटकार ठोकला. हा षटकार त्याने नॅथन लायनच्या गोलंदाजीवर डावाच्या ५८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ठोकला. या षटकाराचा चेंडू १०२ मीटर लांब गेला. त्याचा हा षटकाराचा चेंडू स्टेडियमच्या स्टँडमध्ये गेल्याने प्रेक्षकांनी तो पकडला.

https://twitter.com/cricketcomau/status/1350622944309829632

मात्र त्यानंतर मयंक लगेचच ६१ व्या षटकात जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्टीव्ह स्मिथने पकडला.

या सामन्यात भारताने १०० षटकांच्या आतच ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. यात शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने मोठे योगदान राहिले. या दोघांनी ७ व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करण्याबरोबरच वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. त्यामुळे १६१ धावांवर ५ विकेट्स गमावलेल्या भारतीय संघाने सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कॅमरॉन ग्रीनने चित्त्याच्या चपळाईने एकहाती पकडला रिषभ पंतचा भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

‘तो’ चेंडू टाकला आणि रोहितची विकेट मिळाली, नॅथन लायनने केला रणनीतीचा खुलासा

अर्जुन तेंडूलकरचे मुंबई संघाकडून पदार्पण, इंग्लंडच्या ‘या’ महिला क्रिकेटरने दिल्या खास शुभेच्छा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---