भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना हा नेहमी चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा. सामन्यादरम्यान दोन्ही देशांचे खेळाडूंनी एकमेकांचा सामना करताना आपण पाहिले आहे. परंतु दोन्ही देशांचे माजी खेळाडू जे एकमेकांविरुद्ध खेळत होते. त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हेच खेळाडू केव्हातरी ट्विटर अकाऊंटवरून एकमेकांचा सामना करत असतात.
अशाच प्रकारे पुन्हा एकदा भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हे समोर आले आहेत.
सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. याचमुळे स्टार स्पोर्ट्सने मागील काही दिवसांत २००३ मध्ये झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना दाखवण्यात आला होता. यादरम्यान कैफने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो अख्तरच्या चेंडूवर चौकार मारतो.
यावेळी कैफने ट्विट केले की, “धन्यवाद स्टार स्पोर्ट्स, मुलगा कबीरला (Kabir) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील ऐतिहासिक सामना (Historical Match) पहायला मिळाला. यावेळी कबीर म्हणाला की अख्तरच्या गोलंदाजीवर खेळणे फार कठीण नाही, तर सोपं आहे. कबीरनुसार अख्तर चेंडू इतक्या वेगाने टाकत असल्यामुळे त्याच्या चेंडूवर धावा करणे सोपे होते. आजची मुले पण ना.”
https://twitter.com/MohammadKaif/status/1247486846776406016
कैफने हे ट्वीट मजेशीर अंदाजात केले होते. परंतु अख्तरने हे जास्तच मनावर घेतले. कैफच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत अख्तर म्हणाला की, “मग कबीर आणि अलीमध्ये सामना होऊन जाऊदे? तो वेगवान गोलंदाजीबद्दल उत्तर देणार. कबीरला माझ्याकडून खूप प्रेम.”
Toh phir @MohammadKaif match ho jaaye Kabir aur Mikael Ali Akhtar ka?
????
He'll get his answers about Pace. Haha
Give him my love. https://t.co/cW9NTQAUe0— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 7, 2020
ज्याप्रकारे कैफने मजेशीर अंदाजात हे ट्वीट केले त्याचप्रकारे अख्तरनेही हसत हसत या ट्वीटला प्रत्युत्तर दिले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी
-हा महान खेळाडू म्हणतो, माझ्यामुळे धोनी-कोहलीसारखे हिरे मिळाले भारताला






