---Advertisement---

NZ vs PAK । बाबर आझममुळे चाहता जमीनधोस्त! षटकारासाठी मारलेला चेंडू खांद्याला लागला आणि…

On: बुधवार, जानेवारी 17, 2024 6:14 PM
Babar Azam hit his Fan
---Advertisement---

पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील सलग दुसरा सामना पाकिस्तान संघाने बुधवारी (17 जानेवारी) पराभूत झाला. न्यूझीलंडने 45 धावांनी विजय मिळवून मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. असे असले तरी पाकिस्तानचा माजी कर्णधार मालिकेतील या तिन्ही सामन्यांमध्ये चांगला खेळला. तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान बाबरकडून एका क्रिकेट चाहत्याला दुखापत झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तानचा माजी कर्णधार असून न्यूझीलंड दौऱ्यात संघ शाहीन शाह आफ्रिदी याच्या नेतृत्वात खेळत आहे. टी-20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर शाहीनच्या नेतृत्वातील पहिल्याच मालिकेत पाकिस्तानला परभव स्वीकारावा लागला आहे. शेवटच्या दोन सामन्यांचे निकाल पाकिस्तान संघ आणि कर्णधार शाहीनसाठी महत्वाचे ठरतील. बाबर आझमवरील कर्णधारपदाचा भार कमी झाल्यानंतर दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. त्याने बुधवारी मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक केले. पाकिस्तानला विजयासाठी 225 धावांचे लक्ष्य मिळाले होते. बाबरने 37 चेंडूत 58 धावांचे योगदान दिल्यामुळे संघ कसाबसा 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावांपर्यंत मजल मारू शकला.

पाकिस्तानच्या डावातील 13व्या षटकात बाबर आझम याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला. हा षटकार थेट एका दर्शकाच्या खांद्याला जाऊन लागला. चेंडू इतक्या वेगात येत होता की, खांद्याला लागल्यानंतर हा चाहता खाली पडला. चाहत्याला हा चेंडू लागल्यानंतर बाबरला देखील वाईट वाटले. लाईव्ह सामन्यातील त्याची रिएक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, ही मालिकेतील सलग तिसरी वेळ आहे, जेव्हा पाकिस्तान संघ लक्ष्याचा पाठलाग करताना पराभूत झाला. पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघ 46 धावांनी, दुसऱ्या सामन्यात 21 धावांनी आणि बुधवारी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 45 धावांनी पराभूत झाला. (A fan in the stands was injured after being hit by a ball hit by Babar Azam)

महत्वाच्या बातम्या – 
यशस्वी जयस्वालची लॉटरी! अक्षर पटेल टॉप 5 मध्ये, ICC Ranking मध्ये बाबरही फायद्यात
टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर, पाकिस्तानला मागे टाकून आज विश्वविक्रम रचणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---