भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने काही दिवसांपूर्वीच टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. हे यश मिळवण्यासाठी मीराबाईने खूप कष्ट घेतले आहे. रौप्य पदक जिंकून तिने तिच्या कष्टाचे चीज केले आहे. तिच्या जीवनात घडलेल्या बऱ्याचशा घटना आणि तिने घेतलेले कष्ट खूपच कमी लोकांना माहिती माहिती आहे. त्यामुळेच याची सर्वांना माहिती होण्यासाठी वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या जीवनावर मणिपुरी चित्रपट बनवला जाणार आहे. या संदर्भात मीराबाई चानू आणि इम्फालच्या सेऊटी फिल्म्स प्रॉडक्शन यांच्यात शनिवारी (३१ जुलै) इम्फाल पूर्व जिल्ह्यातील नोंगपोक काचिंग गावात त्यांच्या निवासस्थानी करार झाला आहे.
निर्माण कंपनीचे अध्यक्ष मनोब एमएम यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. मनोबी एमएमने सांगितले की, हा चित्रपट इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमध्ये ‘डब’ केला जाणार आहे.
मनोबी एमएम म्हणाले की, “आम्ही आता मीराबाई चानूचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू करणार आहोत. ती अभिनेत्री देखील काहीशी मीराबाई सारखी दिसणारी हवी आहे. त्यानंतर तिला चानूच्या जीवनशैलीबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे. शूटिंग सुरू होण्यास अजून किमान सहा महिने तरी लागणार आहेत.
मीराबाई चानू ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी दुसरी भारतीय बनली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूच्या विजयामुळे भारताला २१ वर्षांनंतर ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळाले आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरी यांनी ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पहिले पदक जिंकले होते.
हे पदक मिळवण्यापूर्वी मीराबाई प्रशिक्षण घेण्यासाठी दोन वर्षे परदेशी राहिली होती. त्याचबरोबर तिने जेव्हा सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली; तेव्हा आर्थिक परिस्थितीमुळे तिला त्या ठिकाणी पोहचण्यासाठी पैसे कमी पडायचे. तेव्हा तिला एका ट्रक ड्रायव्हरने खूप मदत केली होती. त्याच बरोबर तिच्या वेट लिफ्टींग कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता मिळालेल्या यशापर्यंत सर्वच या चित्रपटात चित्रीकरण केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात परतल्यानंतर आपल्या परिसरातील ट्रक ड्रायव्हरला शोधतेय मिराबाई; पण काय आहे कारण?
डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद