अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टेडियममध्ये एक असा प्रसंग पाहायला मिळाला, जो शक्यतो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाहायला मिळत नाही. दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर शुबमन गिल याने मारलेल्या षटकारामुळे चेंडू गमावला. ग्राउंड स्टाफ चेंडू शोधून दमला, पण अखेर एका चाहत्यांने हा चेंडू शोधून दिला. चा युवा चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी पहिल्या तीन सामन्यांपेक्षा वेगळी आहे आणि फलंदाजीसाठी अधिक अनुकूल असल्याचे दिसते. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 480 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 36 धावा केल्या. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी अनुक्रमे 17 आणि 18 धावा केल्या असून दोघे खेळपट्टीवर कायम आहेत. दुसऱ्या दिवसतील शेवटचे षटक टाकण्यासाठी नेथन लायन आला.
लायनच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारतीय सलामीवीर गिलने पायांचा उपयोग करून सरळ आणि लांब षटकार मारला. गिने मारलेला हा षटकार साईड स्क्रीनच्या जवळ जाऊन पडला आणि चेंडू गमावला. नरेंद्र मोदी स्टेडियमचा ग्राउंड स्टाफ हा चेंडू शोधण्यासाठी धावपळ करत होता, पण चेंडू त्यांना मिळाला नाही. चेंडू सापडत नसल्यामुळे पंचांती काही वेळ खेळ थांबवला. त्यानंतर पंचांना दुसऱ्या चेंडूने खेळ सुरू करण्याचा विचारही केला, पण ऑस्ट्रेलियन संघ नवीन चेंडूने खेळू इच्छित नव्हता. अशातच मैदानात उपस्थित एक चाहता साईड स्क्रीनजवळ जाऊन चेंडू शोधला आणि मैदानात फेकला. या चाहत्यामुळे सामना जास्त वेळ थांबवावा लागला नाही. चेंडू शोधताना या चाहत्यांकडे मैदानातील प्रत्येकाचे लक्ष होते आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चेंडू सापडल्यानंतर मैदानातील चाहत्यांनी टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन दिले.
https://twitter.com/pankaj061098/status/1634154567079284738?s=20
A crowd boy help Australia to find their old ball.#INDvAUS #BGT23 #BorderGavaskarTrophy #RohitSharma𓃵 pic.twitter.com/mA9Ue3Mn0D
— Ankoor singh (@Ankoorsingh23) March 10, 2023
Every gully cricketer in India can relate to his happiness!! 😄 #LostBallFound#INDvAUS pic.twitter.com/aWQRUpaIua
— Nilesh (@bhalanilesh) March 10, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियान संघ दुसऱ्या दिवसानंतर 444 धावांच्या आघाडीवर आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर उस्मान ख्वाजा याने 180, तर कॅमरून ग्रीन याने 114 धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे रविचंद्रन अश्विनने भारतासाठी 6 विकेट्स घेतल्या. अश्विन या प्रदर्शनाच्या जोरावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक 113 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
(A lost ball was found by a fan during the fourth Test between India and Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोक म्हणतात, संजू देवाचं गिफ्ट आहे, पण वास्तवात तो…’, माजी दिग्गजाची सॅमसनच्या चाहत्यांना चपराक
अहमदाबादमध्ये अश्विनने एक नाही, तर नावावर केले हे तीन मोठे विक्रम, ऑस्ट्रेलियाची मोठी आघाडी