अर्जेंटीनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी(२५ नोव्हेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर केवळ फुटबॉल जगतातूनच नव्हे तर संपूर्ण क्रीडाविश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मॅराडोना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
मोदी यांनी ट्विट केले की ‘दिएगो मॅराडोना फुटबॉलचे उस्ताद होते. ज्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी फुटबॉलच्या मैदानातील अनेक अविस्मरणीय क्षण दिले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून सर्वजण दु:खी आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’
Diego Maradona was a maestro of football, who enjoyed global popularity. Throughout his career, he gave us some of the best sporting moments on the football field. His untimely demise has saddened us all. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2020
केवळ मोदीच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, सौरव गांगुली, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री अशा अनेक दिग्गजांनी देखील मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मॅराडोना यांचा १९८६च्या विश्वचषकाचे विजेतेपद अर्जंटीनाला मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी ते अर्जेंटीना संघाचे कर्णधार देखील होते. तसेच १९८६ ला त्यांना मानाचा गोल्डन बॉल आणि सिल्हर शुज मिळाला होता. त्यांनी क्लबस्थरावर बार्सोलिना ज्युनियर, नापोली व बार्सेलिना या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
मॅराडोना यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ३१२ गोल केले. त्याचबरोबर त्यांनी विश्वचषकातील २१ सामन्यात ८ गोल आणि ८ असिस्ट केले आहेत.
वाचा –
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्याबद्दलच्या १२ रंजक गोष्टी, वाचा
कहाणी मॅराडोनाच्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ ची…
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या कारकिर्दीवर एक नजर…