इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खूप खास राहिला आहे. कारण गेल्या १३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच या संघाच्या वाट्याला अंतिम सामन्यात पोहोचण्याचे सुख आले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रविवारी (८ नोव्हेंबर) अबु धाबीमध्ये झालेल्या सामन्यात १७ धावांनी बाजी मारत दिल्लीने अंतिम सामना गाठला. आता फक्त अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. जर खरोखर अंतिम सामन्यात दिल्लीने मुंबईला नमवले, तर एक मोठा योगायोग जुळून येईल.
हा योगायोग म्हणजे, दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षात एका नवख्या संघाने आयपीएलची ट्रॉफी पटकावणे. २००८ साली आयपीएलचा श्रीगणेशा झाला होता. या लीप वर्षात राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारली होती आणि विजयही मिळवला होता.
त्यानंतर चार वर्षांच्या अंतराने म्हणजेच २०१२ या लीप वर्षात गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ प्रथमच अंतिम सामन्यात पोहोचला होता. तसेच त्यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्वप्नभंग करत पहिल्यांदाच चषकावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर पुढील २०१६ सालच्या लीप वर्षात सनरायझर्स हैदराबाद पहिल्यांदा चषकाचा मानकरी ठरला होता.
#FunFact: A new team has won the #IPL every leap year! 🤯
'08 – #RR
'12 – #KKR
'16 – #SRHIs this #DelhiCapitals' year? 😲#Dream11IPL Final | Nov 10, 7:30 PM | Star Sports Network & Disney+Hotstar VIP pic.twitter.com/C4t5lgcROa
— Star Sports (@StarSportsIndia) November 8, 2020
आता २०२०मध्येही पहिल्यांदाच दिल्लीने अंतिम सामन्यात एन्ट्री मारली आहे. अशात १० नोव्हेंबर रोजी बलाढ्य अशा मुंबई इंडियन्स संघाविरुद्धची अंतिम लढाई दिल्लीने जिंकली, तर हा अनोखा योगायोग जुळून येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
असा झाला दिल्ली कॅपिटल्सचा १३ वर्षांचा आयपीएलमधील प्रवास
फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीने केली १३ वर्षांची प्रतिक्षा; पाहा अन्य संघांचा काय आहे रेकॉर्ड
हैदराबादला १७ धावांनी धूळ चारत दिल्लीची फायनलमध्ये धडक, पाहा यापुर्वीच्या फायनलचा इतिहास
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ