पुणे (15 मार्च 2024) – युवा कबड्डी सिरीज मध्ये आजच्या दिवसाचा शेवटचा सामना कोल्हापूर विरुद्ध लातूर या संघात झाला. कोल्हापूर संघ 2 विजयासह पाचव्या क्रमांकावर तर लातूर संघ 1 विजयासह सहाव्या क्रमांकावर होता. कोल्हापूर संघाने आक्रमक खेळ करत गुण मिळवले. सौरभ फगारे व ओमकार पाटीलच्या चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. 7 व्या मिनिटाला लातूर संघाला ऑल आऊट करत 10-00 अशी आघाडी मिळवली.
कोल्हापूर संघाने आपली आघाडी कायम ठेवत गुण मिळवले. मध्यंतराला कोल्हापूर संघाने 21-08 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा पर्यत सौरभ फगारे ने चढाईत 8 गुण मिळवले होते. मध्यंतरा नंतर सौरभ फगारे ने सुपर टेन पूर्ण करत संघाची आघाडी वाढवली. सामन्याची शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना कोल्हापूर संघाने 39-10 अशी मोठी आघाडी मिळवली होती.
उत्तरार्धात कोल्हापूर संघाने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत सामना 53 -10 असा जिंकला. अखेरच्या 16 मिनिटात लातूर संघाला एकही गुण मिळवता आला नाही. कोल्हापूर संघाने लातूर संघाला संपूर्ण सामन्यात 4 वेळा ऑल आऊट सामना एकतर्फी केला. कोल्हापूर कडून सौरभ फगारे ने सर्वाधिक 14 गुण मिळवले. तर ओमकार पाटील ने 8 गुण मिळवले. तसेच बचावपटूंनी उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवला. वैभव रबाडे ने 4 पकडीत गुण मिळवले. तर दादासो पूजारी व धनंजय भोसले यांनी प्रत्येकी पकडीत 3 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- सौरभ फगारे, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- वैभव रबाडे, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – ओमकार पाटील, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या विजयासह पालघर संघ दुसऱ्या क्रमांकावर
अटीतटीच्या लढतीत नंदुरबार संघाची नाशिक संघावर मात