भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. चहलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची पत्नी धनश्री वर्मा रोमँटिक झाली असून आणि जगासमोर तिने आपल्या मनातील सर्वात मोठी गोष्ट सांगितली आहे. धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पती युजवेंद्र चहलसाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
धनश्रीने दिल्या चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा
धनश्री वर्मानी पती युजवेंद्र चहलसोबतचा ए क फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, ‘नम्र,दयाळू, मदत करणारा, निस्वार्थी असे सर्व गुण आणि काही चांगली कौशल्य असलेला व्यक्ती युजवेंद्र चहल आहे. तू कधीही आपल्या स्टेटसचा विचार केला नाही. या स्तरावर हे साध्य करणे सोपे नाही. तू जे देशासाठी आणि लोकांसाठी करत आहे, त्याला तोड नाही. तूझं मन खूप मोठं आहे. मी तूझ्याकडून खूप काही शिकले आहे. मला नेहमीच तुझा खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
https://www.instagram.com/p/CRp6rLyFAvr/
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे एक अतिशय लोकप्रिय जोडपे आहे. ते नेहमीच त्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांचे गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले आहे.
धनश्री वर्माचे डान्सचे एक यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर 15 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. धनश्रीने बॉलिवूडमधील गाण्यांवर अनेक वेळा डान्स केलेला आहे. याशिवाय ती हिप-हॉपचे प्रशिक्षणही देते. ती तिच्या डान्स अॅकॅडमीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करते. धनश्रीने वर्ष 2014 मध्ये डीवाय पाटील डेंटल कॉलेज नवी मुंबई येथून वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेतले आहे. ती पेशाने डेंटिस्ट आहे.
चहल श्रीलंका दौर्यावर आहेत
युजवेंद्र चहल सध्या श्रीलंका दौर्यावर भारतीय संघासोबत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: ऑलिम्पिक उद्घाटनात डौलाने फडकला तिरंगा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व
श्रीलंकाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात वादादरम्यान काय झाले होते बोलणे? वाचा सविस्तर