आजच्या दिवसाची शेवटची लढत नंदुरबार हिमालयन ताहर्स विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज अशी झाली. ‘ब’ गटातील हे दोन संघ होते. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. तेजस काळभोर च्या चतुरस्त्र चढायानी नंदुरबार संघाने आघाडी घेतली. मात्र रत्नागिरीच्या वेद पाटील ने आक्रमक चढाया करत सामन्यात रंगत आणली.
मध्यंतराला 14-14 असा बरोबरीत सामना होता. त्यानंतर मात्र रत्नागिरी ने आक्रमक खेळ करत आघाडी मिळवली. ती आघाडी जास्त वेळ टिकली नाही. नंदुरबारच्या तेजस काळभोर, श्रेयस उबरदंड यांच्या खेळीने सामना 5 मिनिटं असताना 25-25 असा बरोबरीत होता.
वेद पाटील च्या अष्टपैलू खेळीने व साईराज कुंभार ने अखेरच्या क्षणी मिळवलेल्या गुणांनी रत्नागिरी संघाने 30-27 असा सामना जिंकला. वेद पाटील ने चढाईत 9 तर पकडीत 3 गुण मिळवले. तर साहिल माने ने चढाईत 5 गुण मिळवले. साईराज कुंभार ने चढाईत 2 तर पकडीत 2 गुण मिळवत महत्वाची भूमिका निभावली. नंदुरबार कडून तेजस काळभोर ने सर्वाधिक 11 गुण मिळवले तर श्रेयस उमरदंड ने 4 पकडी केल्या. (A winning start for Ratnagiri Aravali Arrows in the relegation round)
बेस्ट रेडर- तेजस काळभोर, परभणी पांचाला प्राईड
बेस्ट डिफेंडर्स- श्रेयस उमरदंड, पालघर काझीरंगा रहिनोस
कबड्डी का कमाल- श्रेयस उमरदंड, पालघर काझीरंगा रहिनोस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स, नाशिक द्वारका डिफेंडर्स संघ प्रमोशन फेरीसाठी पात्र
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-गुजरात सज्ज! नाणेफेक जिंकत हार्दिकचा गोलंदाजीचा निर्णय