---Advertisement---

अफगाणिस्तानच्या विजयानंतर चाहत्याने मारली सामनावीर ठरेलल्या मुजीबला मिठी, भावूक व्हिडिओ एकदा पाहाच

tears in eyes of Mujeeb Ur Rahman's young fan
---Advertisement---

अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी (16 ऑक्टोबर) झालेला विश्वचषक सामना चांगलाच रोमांचक ठरला. अफगाणिस्तानने या 283 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 284 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. मुजीब उर रहमान याने या सामन्यात आपल्या संगासाठी तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मुजीबला मिठी मारून रडणाऱ्या एका चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) याने इंग्लंडविरुद्ध सामन्यात 10 षटकांमध्ये 51 धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. जो रुट, ख्रिस वोक्स आणि हॅरी ब्रुक या तीन महत्वाच्या खेळाडूंना मुजीबने तंबूत धाडले. परिणामी इंग्लंड संघ लक्ष्या पाठलाग करताना 4.3 षटकात 215 धावा करून सर्वबाद झाला. मुजीबची गोलंदाजी संघाच्या विजयात महत्वाची ठरली. कारण हॅरी ब्रुक इंग्लंडसाठी खेळपट्टीवर पाय रोऊन उभा होता, ज्याला मुजीबने बाद केले. वैयक्तिक 66 धावा करून ब्रुकने यष्टीरक इकराम अलीखिल याच्या हातात विकेट गमावली.

सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तान संघाने केले जल्लोष पाहण्यासारखा ठरला. सर्व संघ उत्साहात असताना मुजीब मात्र, आपल्या लहानग्या चाहत्याला समजावण्यात व्यस्त होता. मुजीबच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून केल्या गेलेल्या पोस्टमध्ये हा व्हिडिओ पाहायला मिळाला. हा चाहता मुजीला मिठी मारून रडताना दिसला. सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळे प्रश्न आणि मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, वनडे विश्वचषक 2023 मधील पहिल्या 13 सामन्यांनंतर अफगाणिस्तान संघ सहाव्या, तर इंग्लंड पाचव्या क्रमांकावर होता. या दोन्ही संघआंनी प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले अशून प्रत्येकी एक-एक विजय मिळाला आहे. अफगाणिस्तनला आपला पुढचा सामना16 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध चेन्नईमध्ये खेळायचा आहे. तसेच इंग्लंड 21 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आपाला विश्वचषकातील चौथा सामना खेळेल. (A young fan of Mujeeb Ur Rahman in tears after a memorable win of Afghanistan)

महत्वाच्या बातम्या – 
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा
ब्रँड इज ब्रँड! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याचं कारण विराट, आयोजकांची जगासमोर कबुली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---