---Advertisement---

ब्रँड इज ब्रँड! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याचं कारण विराट, आयोजकांची जगासमोर कबुली

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आयओसीने लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन झाले आहे. सोमवारी (दि. 16 ऑक्टोबर) मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत, आयओसीने याबाबत घोषणा केली. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यामागे विराट कोहली हा एक मोठे कारण असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.

आयओसीच्या (IOC) कार्यकारी बोर्डाने मागील आठवड्यात क्रिकेटला (Cricket In Olympics) स्पर्धेत सामील करण्यासाठी लॉस एंजेलिस स्पर्धेच्या आयोजकांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यामध्ये क्रिकेटव्यतिरिक्त इतर चार खेळ- बेसबॉल/ सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॉश यांसारख्या खेळांचा समावेश आहे. या सर्व खेळांचा 2028 ऑलिम्पिकमध्ये समावेश होत असल्याची औपचारिक घोषणा आयोजक समितीचे संचालक निकोलो कॅम्परियानी यांनी केली.

क्रिकेटला स्पर्धेत समावेश करण्याविषयी बोलताना ते म्हणाले,

“मला वाटते, माझा मित्र विराट कोहली याचे एक मोठे कारण आहे. सध्या तो इंस्टाग्राम वर सर्वाधिक प्रसिद्ध खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्याचे जवळपास 314 मिलियन फॉलोवर्स आहेत. जे लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रूडी व टायगर वूड्स यांच्या एकत्रित फॉलोअर्स पेक्षा जास्त आहे. क्रिकेटसाठी ही एक चांगली गोष्ट आहे.”

सध्या क्रिकेट हा भारतीय उपखंडातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. भारतीय उपखंडातील एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केल्याने आयोजकांना मोठ्या प्रमाणात दर्शक लाभू शकतात. याव्यतिरिक्त अमेरिकेत देखील मोठ्या प्रमाणात उपखंडातील लोक असल्याने ते लोक मैदानावर गर्दी करण्याची शक्यता आहे.

(2028 LA Olympic Organizers Said Virat Kohli Is Main Reason For Including Cricket In Olympics)

हेही वाचा-
श्रीलंकेच्या सलामीवारांचा भन्नाट विक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, वाचाच
पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्कची लंकन फलंदाजाला ताकीद, चेंडू टाकण्यापूर्वीच निघालेला क्रीझच्या बाहेर; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---