आयपीएल २०२० मधील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. यासह त्यांनी पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. रोखठोक मत व्यक्त करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉने मुंबई इंडियन्सच्या विजयाबाबत नुकतेच मोठे वक्तव्य केले आहे.
वॉने म्हटले आहे की, जर मुंबई इंडियन्सला टी२० विश्वचषकात खेळण्यासाठी पाठवले, तर ते तिथेही विजय मिळवतील. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहिले की, “मी पुन्हा सांगतो की, मुंबई इंडियन्स टी२० विश्वचषकही जिंकेल.”
I reckon the @mipaltan would Win the T20 World Cup …. #Justsaying #IPL2020final
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 10, 2020
टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानीला मायकल वॉच्या या ट्वीटबद्दल विचारले. त्यावर आकाशने म्हटले की, “आज संपूर्ण दिवसात मी पाहिलेली ही सर्वात चांगली कमेंट आहे.”
आकाश अंबानीने संघाच्या यशाबद्दल बोलताना म्हटले, “आमची कामगिरी ही जय पराभवाच्या बाबतीत एकूण मागील वर्षाप्रमाणेच आहे. परंतु जिथपर्यंत क्रिकेटच्या गुणवत्तेची गोष्ट आहे, तर याबाबतीत आमची कामगिरी मागील १३ वर्षांच्या तुलनेत सर्वोत्तम राहिली आहे.”
तो पुढे म्हणाला, “आम्ही जी योजना बनवली होती आणि आम्ही जे केले आहे, त्याबाबतीत आम्ही ९५ ते ९८ टक्के यशस्वी ठरलो आहे.”
या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स संघाने सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर त्यांनी क्वालिफायर १ मध्ये आणि अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल द्रविडने सांगितले, मुंबई इंडियन्सच्या यशामागील ‘हे’ आहे खरे कारण
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर घेतलं ताब्यात
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…