भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात अर्शदीवला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिले दोन्ही एकदिवसीय सामने भारताने जिंकले असून तीन सामन्यांच्या या मालिकेत संघ ०-२ अशा आघाडीवर आहे. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) मात्र या दोन्ही सामन्यात संघासाठी खेळू शकला नाही. याचाच अर्ध वेस्ट इंडीजने ही मालिका आधीच गमावली आहे. माजी दिग्गज आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते अर्शदीपला जरी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली, तरी याचा काहीच फायदा होणार नाही.
आकाश चोप्रा स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. त्याच्या मते अर्शदीपला फक्त एक सामना खेळून काहीच फायदा होणार नाही. तो म्हणाला की, “शेवटच्या सामन्यात बदल होण्याची काहीच शक्यता काहे का? कोणाला संधी दिली जोऊ शकते, तसेच पण कोण राहिले आहे, ज्याला संधी मिळाली पाहिचे किंवा संघातून वगळले पाहिजे? तुम्ही याठिकाणी अर्शदीपला खेळवू शकता का?, मला असे वाटत नाही की, तुम्ही त्याला खेळवू शकाल. कारण एका सामन्यात खेळवून काय फायदा होईल.”
दरम्यान, अर्शदीप सिंगने आयपीएल २०२२ हंगामात पंजाब किंग्जसाठी लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने हंगामाच जास्त विकेट्स घेतल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या षटकांमध्ये विरोधी संघाच्या धावांवर लगाम लावण्यात त्याला यश आले होते. हंगामात त्याने ७.७० च्या इकोनॉमीने १० विकेट्स घेतल्यो होत्या. या प्रदर्शानंतर मायदेशात खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला पहिल्यांदा निवडले गेले होते. तसेच आयर्लंड दौऱ्यातही तो संघासोबत होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले गेले. त्याने या सामन्यात ३.३ षटकांमध्ये १८ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडिया जिंकतेय खरी; पण या कमजोरीवर जाईना कोणाचेच लक्ष
टी२०त हीट, तर वनडेत फ्लॉप! टीम इंडियाचे टेंशन वाढवतोय ‘हा’ खेळाडू
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला