टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. गिलकडे भारताचा पुढचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून पहिलं जात होतं. पण त्याची गेल्या काही सामन्यांतली कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याला फॉर्मसाठी सतत झगडत राहावं लागतंय.
शुबनमला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीपूर्वी दुखापत झाली होती. तसेच तो मेलबर्न कसोटी देखील खेळू शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सिडनी कसोटीत त्याला खेळण्याची संधी मिळाली, पण तिथे सुद्धा त्याची बॅट चालली नाही. त्यानंतर गिलला टीम इंडियातून वगळण्याची मागणी होत आहे. शुबनम गिलला अपयश येऊन सुद्धा संघानं संधी दिली. पण त्याची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुबनम गिलला वनडे आणि टी20 मालिकेत संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. पण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर गिलच्या कारकिर्दीला नवे वळण आले आहे. गिलला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधार बनवून कर्णधार पदाची चाचणी घेण्यात आली. त्यानं आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्त्व चांगल्या प्रकारे केलं होतं. परंतु भारतासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करू न शकल्याने चाहते त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी करत आहेत. यावर आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आकाश चोप्रांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, शुबनम गिलला सतत उपकर्णधार बनवलं जात होतं, पण अचानक आता तो कर्णधारपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. गिलची टी20 फॉरमॅटमधील भूमिका जवळपास संपली असल्याचं आकाश चोप्रांचं मत आहे. गिलला उपकर्णधार पदावरून हटवण्यात आल्यानंतर आकाश चोप्रा यांनी कर्णधार आणि उपकर्णधारची नावे सुचवली. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत त्यांनी कर्णधारदासाठी जसप्रीत बुमराहला तर उपकर्णधार पदासाठी रिषभ पंत किंवा यशस्वी जयस्वाल यांचे नावं सुचवले आहेत.
हेही वाचा –
वयाच्या 45 व्या वर्षी या खेळाडूची रोनाल्डोच्या सेलिब्रेशनची कॉपी, पाहा VIDEO
‘हे अविश्वनसनीय आहे….’, आयकॉनिक ऑडी 100 पाहून रवी शास्त्री आठवणींमध्ये हरवले
पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूची निवड ठरली इंग्लंडची डोकेदुखी, भारत दौऱ्यापूर्वी व्हिसा अडकला