पाकिस्तान संघाचा दिग्गज गोलंदाज वासिम अक्रमला ‘स्विंगचा किंग’ म्हटले जाते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवले आहे. या दिग्गज गोलंदाजाच्या पावलांवर पाऊल ठेवत पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज आमीर यामिन देखील आपल्या स्विंग गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत कराची किंग्ज संघाकडून खेळताना त्याने एक इन स्विंगर चेंडू टाकून फलंदाजाला बाद केले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. आता स्पर्धेचा दुसरा टप्पा अबुधाबीमध्ये खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या टप्प्यात १५ जून रोजी पेशावर झाल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात आमीर यामिनने उत्कृष्ट इन स्विंगर चेंडू टाकल्याचे पाहायला मिळाले.
तर झाले असे की,कराची किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना १०९ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पेशावर झाल्मी संघातील फलंदाज कामरान अकमल खेळपट्टीवर आपला पाय जमवण्याचा प्रयत्न करत होता. अशातच आमीरने दुसऱ्याच षटकात जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली होती.
षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी आमीरने अकमलाचा कमकुवत पक्ष ओळखून घेतला होता. त्यानंतर आमीर धावत आला आणि त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर तो चेंडू आतल्या दिशेने स्विंग झाला आणि फलंदाजाला चुकवत यष्टी उडवून निघून गेला. हा चेंडू पाहून फलंदाज देखील आश्चर्यचकित झाला होता. (Aamer yamin inswinger delivery in PSL)
Uffff! @amiryamin54 ne tabahi phaila di!
What a delivery to get rid of @KamiAkmal23 👏🏼 #MatchDikhao l #HBLPSL6 I #PZvKK pic.twitter.com/h4F6rWu9NC— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 15, 2021
आमीरने या सामन्यात २ षटक गोलंदाजी केली. यामध्ये २७ धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. प्रथम फलंदाजी करताना कराची किंग्ज संघाने २० षटकात ९ गडी बाद १०८ धावा केल्या होत्या. हे आव्हान पेशावर झाल्मी संघाने ११ षटकांत पूर्ण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–हिटमॅनची बातच न्यारी! पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या त्या प्रश्नावर रोहितचे भन्नाट उत्तर
–इंग्लिशसह या भारतीय भाषांमध्ये होणार WTC Final चे थेट प्रसारण; मराठीचा मात्र समावेश नाही
–अरेरे! पावसात हेलिकॉप्टर शॉट मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल