मोहम्मद शमी भारतीय संघाचा आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक मानला जातो. सध्या तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. आयपीएल २०२२ मध्येही त्याने चांगली गोलंदाजी केली आणि गुजरात टायटन्सला विजेतेमद मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदानही दिले. असे असले तरी, भारताचा माजी दिग्गज गोलंदाज आशीष नेहराला वाटते की, शमीला यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता नाहीये.
आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स या नवख्या फ्रँचायजीने विजेतेपद पटकावले. आशीष नेहरा (Ashish Nehra) या संघाचा प्रशिक्षक होता, तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) देखील संघासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज ठरला. शमीने या हंगामात गुजरातसाठी १७ सामन्यांमध्ये सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या. हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत शमी सहाव्या क्रमांकावर होता. असे असले तरी, त्याला आंतरराष्ट्रीय टी-२० संघात संधी मिळताना दिसत नाहीये.
याच पार्श्वभूमीवर नेहराला वाटत आहे की, शमी यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात देखील भारतीय संघाचा भाग नसेल. माध्यांतील वृत्तानुसार नेहरा म्हाणाला की, असे वाटते की, मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकाच्या नियोजनात नाहीये. आपल्या सगळ्यांना मोहम्मद शमीच्या क्षमतांविषयी माहिती आहे. मग त्याने २०२२ चा टी-२० विश्वचषक खेळला नाही, तरी २०२३ मध्ये मायदेशात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात तो भारतीय संघात सहभागी असू शकतो.
नेहरा असेही म्हटला की, भारत इंग्लंडमध्ये त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंसह खेळू इच्छित असेल. शमीही त्यापैकी एक आहे. भारताला यावर्षी एकदिवसीय सामने जास्त खेळायचे नाहीत, आयपीएलनंतर शमी विश्रांतीवर आहे. अशात कसोटी सामन्यानंतर (इंग्लंडविरुद्ध) एकदिवसीय मालिकेत शमीला संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह अशा दिग्गज खेळाडूंसोबत मोहम्मद शमी देखील इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून खेळायचा आहे. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिकाही खेळली जाणार आहे. शमीने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध खेळला होता. अशात आगामी टी-२० विश्वचषकात त्याला संधी मिळते की नाही, हे पाहण्यासारखे असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारत-दक्षिण आफ्रिका सामना सुरू होण्याआधी पावसाला सुरूवात, संघ जिंकेल की पाऊस?
दौऱ्यापूर्वी लक्ष्मण यांनी दिला भारतीय संघाला मोलाचा संदेश, बीसीसीआयने फोटो केले शेअर
भारताचे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार!, ‘या’ पाच गोष्टी पराभवाला ठरणार कारणीभूत