दक्षिण आफ्रिकाचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथची विशेष अंदाजात तुलना केली आहे. डिविलियर्सने विराटची तुलना दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररशी केली आहे. तर, स्मिथची तुलना टेनिसपटू राफेल नदालशी केली आहे. AB De Villiers feels virat kohli is like roger federer and steve smith is like rafael nadal.
डिविलियर्सने क्रिकेट समालोचक पोमी म्बान्गवा यांच्याशी झालेल्या इंस्टाग्राम लाइव्ह सेशनदरम्यान दोन्ही खेळाडूंविषयी सांगितले. विराट हा स्मिथपेक्षा दमदार स्ट्रायकर आहे आणि स्मिथ हा मानसिकरित्या विराटपेक्षा खूप मजबूत खेळाडू असल्याचे त्याने सांगितले.
डिविलियर्स म्हणाला की, “विराट हा फेडररसारखा नैसर्गिक बॉल स्ट्रायकर आहे. तो वेगवेगळ्या प्रकारे धावा करण्याचा मार्ग शोधून काढतो. त्याचा खेळ जास्त स्वाभाविक नसतो. पण ते अनेक विक्रम मोडण्यास सक्षम आहे. त्याने जगभरात सर्व मैदानावर धावा केल्या आहेत. तर, स्मिथ हा नदालसारखा मानसिकदृष्ट्या मजबूत खेळाडू आहे.”
चर्चेदरम्यान पोमी म्बान्गवाने डिविलियर्सला सचिन तेंडुलकर आणि विराट या दोघांमधील एका खेळाडूला निवडायला सांगितले. तर, डिवविलियर्स म्हणाला की, “सचिन हा माझा आणि विराट दोघांचाही आदर्श आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत जे काही मिळवले, ते सर्वांसाठी एका उत्तम उदाहरणाप्रमाणे आहे. विराट स्वत:देखील सचिनची निवड करेल.”
“पण, वैयक्तिक स्वरुपात पाहिले तर मी विराटसारखा धावांचा पाठलाग करणारा खेळाडू माझ्या उभ्या आयुष्यात नाही पाहिला. सचिन सर्व परिस्थितीतील दमदार खेळत होता. पण, विराट हा सचिनपेक्षा धावांचा पाठलाग उत्कृष्ट खेळाडू आहे,” असे डिविलियर्सने पुढे म्हटले.
विराट आणि डिविलियर्स हे गेल्या अनेक वर्षापासून आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सोबत खेळत आहेत. विराट हा आरसीबी संघाचा कर्णधार आहे. तर, डिविलियर्स हा संघाचा प्रमुख खेळाडू आहे. दोघेही मैदानावर ताळमेळ साधून खेळत असतात. त्याबरोबरच दोघेही एकमेकांचा आदर करतात. अनेकदा दोघांच्या उत्कृष्ट भागिदारीमुळे आरसीबीने अनेक सामने जिंकले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
टी२० विश्वचषक व्हावं की नाही? ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतात…
रागारागात मैदानावर आलेल्या धोनीने सामन्यानंतर मागितली माफी
बांगलादेशच्या माजी खेळाडूचा वसीम अक्रमवर गंभीर आरोप, म्हणतो त्याने…