शारजाह । आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सला 82 धावांनी पराभूत केले. आरसीबीच्या विजयाचा नायक ठरलेला आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्सने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. या खेळीदरम्यान त्याने मैदानाबाहेर एक षटकार मारला आणि चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर जाऊन आदळला. डिविलियर्सने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
16 व्या षटकांत मारला लांबलचक षटकार
महत्त्वाचे म्हणजे डिविलियर्सने या सामन्यात आयपीएल कारकीर्दीतील 36 वे अर्धशतक पूर्ण केले. 16 व्या षटकांत केकेआरचा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी गोलंदाजी करत होता, षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डिविलियर्सने लांबलचक षटकार ठोकला, चेंडू मैदानाबाहेर गेला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर जाऊन आदळला. डिविलियर्सने मारलेल्या या षटकाराची लांबी 86 मीटर होती.
https://twitter.com/CowCorner9/status/1315692443761664000?s=20
https://twitter.com/Ashish_ark_31/status/1315709085447200768
https://twitter.com/AbhinavKarthik_/status/1315675181206007809?s=20
https://twitter.com/watsonmpaul/status/1315678865549914112
https://twitter.com/Maara_offil/status/1315681477322067970?s=20
डिविलियर्सने खेळलेल्या या विस्फोटक खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगलोर संघाला 194 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. प्रत्युत्तरादाखल कोलकाताला अवघ्या 112 धावा करता आल्या. डिविलियर्सने केलेल्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
कोलकाताकडून युवा फलंदाज शुबमन गिलने सर्वाधिक 34 धावा केल्या. कोलकाताचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसलने काही मोठे फटके खेळले पण तोही जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
बंगलोरचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 12 धावा देऊन कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मिस्टर ३६०ची ‘ही’ करामत पाहून कोणताही गोलंदाज म्हणेल, याला बॉलिंग नकोच
-विराट-डिविलियर्सच्या जोडीला तोडंच नाही, ‘या’ जोड्यांना मागे टाकत रचलाय खास विक्रम
-“१० कोटी नाही तर त्याची किंमत…”, माजी भारतीय क्रिकेटरने साधला मॅक्सवेलवर निशाना
-गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…
ट्रेंडिंग लेख-
-“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?






