---Advertisement---

वर्ल्डकपआधी विदेशी दिग्गजाने गायले श्रेयसचे गुणगान, म्हणाला,‌”तो टीम इंडियाचा…”

On: रविवार, ऑक्टोबर 1, 2023 3:42 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषक भारतातच आयोजित केला जाईल. यजमान भारतीय संघ अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वात या स्पर्धेत सहभागी होत आहे. भारतीय संघाला यावेळी विजेतेपदाचा दावेदार मानले जात असतानाच, भारताच्या मधल्या फळीवर मोठी मदार असेल. भारताच्या फलंदाजांपैकी महत्त्वाचा फलंदाज असलेल्या श्रेयस अय्यर याचे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलीयर्स याने कौतुक केले आहे.

एबी‌ नुकताच आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता, त्यावेळी त्याने बोलताना श्रेयस अय्यर याचे गुणगान गायले. तो म्हणाला,

“श्रेयस भारताच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. मला त्याची फलंदाजी पाहायला खूप आवडते. तो मधल्या फळीत जो काही खेळतो ते मला भावते. अतिशय शांतचित्ताने व निग्रहाने तो फलंदाजी करतो. ज्यामुळे मला शुबमन गिल याची आठवण येते. श्रेयस विश्वचषकात भारतासाठी नक्कीच सर्वोत्तम कामगिरी करेल.”

मार्च महिन्यापासून श्रेयस भारतीय संघाबाहेर होता. आशिया चषक स्पर्धेत त्याने पुनरागमन केलेले. मात्र, त्या स्पर्धेतही केवळ एक सामना खेळून तो जखमी झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या वनडे मालिकेत त्याला संधी देण्यात आली. इंदोर वनडेत त्याने वेगवान शतक झळकावत आपण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले. त्यामुळे विश्वचषका त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल.

विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.

(AB De Villiers Praised Shreyas Iyer Ahead World Cup)

हेही वाचा-
विश्वचषक 2011मध्ये सचिनने दिलेला ‘विमानतळावर हेडफोन घालण्याचा’ सल्ला, युवराजचा खुलासा
इतिहास ODI World Cupमधील पहिल्या सामन्यांचा, वाचा सर्वाधिक वेळा कुणाच्या पदरी पडलाय विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---