---Advertisement---

‘आम्हाला वेगळे टाकू नका, धार्मिक वातावरणाची शिक्षा देऊ नका’, अफगाणिस्तान क्रिकेटच्या सीईओ यांची विनंती

On: शनिवार, सप्टेंबर 11, 2021 3:38 PM
---Advertisement---

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर पुरुषांच्या क्रिकेटला परवानगी दिली, पण महिला क्रिकेटला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानने जर महिलांंना खेळण्याची परवानगी दिली नाही तर त्यांच्यासोबत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे सीईओ हमीद शिनवारी यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी विनंती केली आहे.

महिला क्रिकेट संघाला परवानगी दिली गेली नाही, तर आयसीसीच्या नियमांप्रमाणे अफगाणिस्तान पुरुष कसोटी क्रिकेट संघाचा दर्जा गमावू शकतो.

आयसीसीच्या नियमांप्रमाणे कोणत्याही संघाला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी तेव्हाच असते, जेव्हा त्यांच्याकडे महिला संघ उपलब्ध असेल. तालिबानचे महिलांविषयीचे कायदे खूप कडक असून त्यांनी अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला खेळण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही.

याच पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी(९ सप्टेंबर) सांगितले की, जर तालिबान महिलांना खेळण्यापासून रोखत असेल, तर २७ नोव्हेंबरपासून होबार्टमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियमधील कसोटी सामना रद्द केला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार टिम पेननेही या कारणामुळे अफगाणिस्तानवर टीका केली होती. एसीबीचे सीईओ शिनवारीने सांगितले की ते या निर्णयावर स्तब्ध आणि निराश आहेत.

त्यांनी म्हटले की हा ऐतिहासिक सामना रद्द करण्याव्यातिरिक्तही पर्याय आहेत. त्यांनी याविषयी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे विनंती केली आहे. ते म्हणाले, “आम्ही ऑस्ट्रेलिया आणि पूर्ण क्रिकेट विश्वाला विनंती करतो की आमच्यासाठी वाट मोकळी करा. आमच्या सोबत चाला आणि आम्हाला वेगळे टाकू नका. आमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाची शिक्षा आम्हाला देऊ नका.”

त्यांनी असेही सांगितले की, जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाप्रमाणे दुसऱ्या देशांनीही केले, तर अफगाणिस्तान विश्व क्रिकेटपासून वेगळे पडेल आणि देशात क्रिकेट संपुष्टात येईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘निर्णायक क्षणी भारतीय संघाने चांगली कामगिरी केली’, अँडरसनने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने

आपल्या खेळाडूंना मँचेस्टरवरुन युएईला आणण्याच्या तयारीत चेन्नई सुपर किंग्स, सीईओने दिली माहिती

इकडे आड तिकडे विहीर! रवींद्र जडेजा फसला मोठ्या पेचात, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---