सध्या भारत आणि श्रीलंका संघात टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारताच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उचलण्यात आले होते. मात्र, आता माध्यमांच्या अहवालानुसार एक महत्वाची गोष्ट समोर येत आहे. भारताच्या कसोटी आणि टी20 संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा राहण्याची बाब समोर आली, कारण बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना त्याच्या नेतृत्वात कोणतीही असंतोषजनक गोष्ट दिसली नाही. टी20 विश्वचषकात उपांत्यफेरीत मिळालेल्या पराभवामुळे बीसीसीआय भारतीय संघाचे निरीक्षण करत होती. याच संदर्भात जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ज्यामध्ये रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे देखील सामील झाले होते.
माध्यंमाच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील कर्णधारपदाला कोणताही धोका नाहीये. त्याच्या नेतृत्वात कोणतेही दोष नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत मागील निवड समितीचे अध्यक्ष चेचन शर्मा (Chetan Sharma) आणि त्याबरोबरच एनएसए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हे देखील सामील झाले होते.
सध्या बीसीसीआयचे पूर्ण लक्ष यावर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर आणि भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. या बैठकीत टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आलेला नव्हता. भारताकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या टी20 मालिकेसाठी हार्दिक मुंबईत दाखल झाला आहे.
भारतीय संघ मागील बऱ्याच काळापासून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत सातत्याने अपयशी होत आला आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी भारतीय संघाच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण केले गेले. भारतीय संघाला यावर्षी पार पडलेल्या टी20 विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताला या उपांत्यफेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून 10 विकेट्सने लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रोहित शर्मावर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती. मात्र, बीसीसीआयच्या या बैठकीनंतर रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर पुनरागमन करणार? गोलंदाजाचे मोठे विधान
आता भारतासाठी पदार्पण करणे सोपे नाही! बीसीसीआयच्या आढावा बैठकीत घेतला गेला मोठा निर्णय