आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. यावेळी मुद्दा भारतीय संघाच्या सीमा ओलांडण्याबद्दल नाही, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अधिकृत लोगो/चिन्हाशी संबंधित आहे. खरेतर, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या जर्सीवर यजमान देश पाकिस्तानचे नाव लिहिण्यास नकार दिला होता.
आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि असे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
एका पाकिस्तानी माध्यम संघटनेने आयसीसीच्या सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, स्पर्धेचा लोगो/चिन्ह जर्सीवर लावण्याची जबाबदारी राज्य किंवा देशाची आहे. सर्व संघांना हा नियम पाळावा लागेल. बीसीसीआयने आपल्या संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास परवानगी देण्यास नकार दिल्याच्या अफवांचे आयसीसीने स्पष्टपणे खंडन केले होते. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संघावर कठोर कारवाई केली जाऊ शकते, असेही सांगण्यात आले.
केवळ आयसीसीच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) सूत्रांनीही माहिती दिली आहे की, भारतीय संघाच्या जर्सीवरून पाकिस्तान हे नाव काढून टाकल्याच्या बातम्या निराधार आहेत. पीसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या संदर्भात कोणाशी संपर्क साधलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IIT बाबामुळे भारताने जिंकला 2024चा टी20 विश्वचषक? महाकुंभ मेळाव्यात स्वत:च केला खळबळजनक दावा! VIDEO
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी निवड न झाल्याने सूर्यकुमार यादवने व्यक्त केले दु:ख! म्हणाला…
बीसीसीआयच्या नव्या नियमांवर इंग्लंड कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “हे नियम चुकीचे…”