आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (ICC Champions Trophy 2025) एक मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानला जाणार आहे. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. कोणत्याही आयसीसी स्पर्धेपूर्वी कर्णधारांचे फोटोशूट केले जाते. हे फोटोशूट सहसा यजमान देशातच होते. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही एक फोटोशूट होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. या कारणास्तव ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलद्वारे आयोजित केली गेली. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबई, यूएई येथे खेळेल. आता अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानला जाऊ शकतो. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) यावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
कोणत्याही आयसीसी स्पर्धेपूर्वी कर्णधारांचे फोटोशूट असते. यासोबतच पत्रकार परिषदही आयोजित केली जाते. परंतु आयसीसीने अद्याप फोटोशूटची तारीख जाहीर केली नाही, किंवा त्याचे ठिकाणही जाहीर केले नाही. जर रोहित पाकिस्तानला गेला नाही, तर फोटोशूटचा काही भाग दुबईमध्येही होऊ शकतो. पण याबद्दल देखील अधिकृत माहिती समोर आली नाही.
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 2007ला वनडे पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 265 वनडे सामने खेळले. त्यामध्ये त्याने 257 डावात फलंदाजी करताना 10,866 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 49.16 आहे, तर त्याचा स्ट्राईक रेट 92.43 आहे. वनडेत रोहितने 57 अर्धशतकांसह 31 शतके झळकावली आहेत. वनडेत त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; निवडकर्त्यांना यष्टीरक्षक आणि लेग स्पिनरबाबत डोकेदुखी, पाहा कोण-कोण शर्यतीत?
Ashes ODI series; रोमांचक सामन्यात कांगारुंचा विजय, इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव
ऑस्ट्रेलियाच्या लज्जास्पद दौऱ्यानंतर बीसीसीआय कठोर भूमिकेत, खेळाडू आणि प्रशिक्षकांवर लादणार हे निर्बंध