वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाली आणि त्याने अर्ध्यातून मैदान सोडले. फलंदाजी करताना रोहित रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे भारतीय चाहत्यांची चिंता मात्र चांगलीच वाढली. भारताने वेस्ट इंडीजविरुद्धचा हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला, पण मालिकेतील राहिलेल्या दोन सामन्यांमध्ये रोहित खेळेल की नाही? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशातच आता रोहितच्या फिटनेसविषयी एक चांगली बातमी समोर येत आहे.
टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर बीसीसीयने स्पष्ट केले की, पाठीच्या दुखण्यामुळे त्याला मैदाना सोडावे लागेल. सध्या रोहित मेडिकल टीमच्या निदर्शनात आहे, असेही बीसीसीआयने सांगितले होते. तिसरा सामना जिंकल्यानंतर रोहितने स्वतः त्याच्या फिटनेसविषयी माहिती दिली होती. रोहितने सांगितल्यानुसार, तो म्हटलेला की फ्लॉरिडामध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट होईल.
रोहितच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती –
रोहित म्हटला होता की, “सध्या तो ठीक आहे. आमच्याकडे पुढच्या सामन्यापूर्वी काही दिवस आहेत. आशा आहे की, हे (दुखापत) ठीक होईल.” रोहित वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अपेक्षित खेळी करू शकला नाही, परंतु पहिल्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ६४ धावांची ताबडतोड खेळी केली होती. आता राहिलेल्या दोन टी-२० सामन्यांमध्येही रोहित खेळताना दिसेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. क्रिकबज वेबसाईडने याविषयी महत्वाची माहिती दिली आहे. वृत्तानुसार, रोहित शनिवारी (६ ऑगस्ट) आणि रविवारी (७ ऑगस्ट) खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
असे असले तरी, रोहित जर या दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नाही, तर संघ व्यवस्थापनाकडे सलामीवीर फलंदाजाचा दुसरा पर्याय सध्या संघात उपलब्ध आहे. इशान किशन रोहितच्या अनुपस्थितीत भारताला चांगली सुरुवात देऊ शकतो. तसेच कर्णधाराची भूमिका पार पाडण्यासाठी रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या असे पर्याय आहेत. या दोघांनीही काही दिवसांपूर्वी भारतीय संघात कर्धणाराची भूमिका पार पाडली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील हे शेवटचे दोन्ही सामने अमेरिकेत आयोजित केले गेले आहेत. अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन मिळण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचेही सांगितले जात आहे. भारतीय संघ सध्या १-२ अशा आघाडीवर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्क्वॉश एकेरीत भारताचे पहिले पदक! सौरव घोषालची ऐतिहासिक कामगिरी
WIvsIND: टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! शेवटच्या सामन्यांवर निघाला तोडगा
CWG 2022: जेमिमाहच्या अर्धशतकाने सावरला भारताचा डाव, बार्बाडोसपुढे विजयासाठी १६३ धावांचे आव्हान