महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. संपूर्ण जगात धोनीचे अनेक चाहते आहेत. धोनी जरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहत नसला तरीदेखील त्याला अनेक चाहते फॉलो करतात. त्याचबरोबर धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. धोनीच्या चाहत्यांच्या यादीत आणखी एका व्यक्तीच्या नावाचा समावेश झाला आहे. ते नाव आहे बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग.
सोमवारी (२६ जुलै) रणवीर आणि धोनी यांनी एकत्र चॅरिटी फुटबॉल सामना खेळला आहे. याच दरम्यान रणवीरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रणवीरने धोनीला आपला मोठा भाऊ असल्याचे म्हटले आहे.
धोनी आणि रणवीर सिंग मुंबईतील एका स्टेडियमवर एकत्र फुटबॉल सामना खेळताना दिसून आले आहेत. या चॅरिटी सामन्यादरम्यान जेव्हा धोनी बाकड्यावर बसला होता, तेव्हा रणवीर त्याच्या समोर जमिनीवर बसलेला दिसून आला. रणवीरने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याचबरोबर हा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शन देखील खूप विशेष लिहिले आहे. रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नेहमीच मोठ्या भावाच्या पायांजवळ.’
या सामन्यादरम्यान रणवीर धोनीला घट्ट मिठी मारताना देखील दिसून आला आहे. दोघेही ऑल स्टार्स फुटबॉल क्लबचा एक भाग होते. बॉलिवूड आणि क्रिकेट व्यतिरिक्त जगातील बऱ्याचशा नामांकित व्यक्तींमध्ये हा फुटबॉल सामना आयोजित केला आहे आणि या सामन्याच्या माध्यमातून चॅरिटीसाठी निधी गोळा केला जात आहे.
रणवीर आणि धोनी व्यतिरिक्त भारतीय युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरने देखील या चॅरिटी सामन्यात भाग घेतला आहे. दुखापतीमुळे श्रेयस बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. तो आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामने खेळताना दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आयपीएल सामन्यादरम्यान मैदानावर दिसून येणार आहे आणि संघाचे नेतृत्व देखील करताना दिसून येणार आहे.
आयपीएलचे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळले जाणार आहेत. दुसर्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पाच वेळच्या चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बोंबला! चक्क लाईव्ह सामन्यात घुसला चोर, क्रिकेटपटूंनी मॅच सोडून केला पाठलाग अन्…
‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारताच्या जेमिमाचा जलवा कायम, अवघ्या १० चेंडूत चोपल्या ४० धावा