जेव्हा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा अपघात झाला, तेव्हा संपूर्ण भारतात एकच खळबळ माजली होती. चाहत्यांपासून ते दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर पंत लवकरात लवकर बरा होण्यासाठी पोस्ट शेअर केल्या होत्या. पंतला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची आई मीरा रौतेला यांचाही समावेश होता. उर्वशी आणि रिषभच्या मतभेदांमध्ये आता मीरा यांनी क्रिकेटपटूच्या आरोग्यासाठी चिंता व्यक्त केल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मीरा रौतेला (Meera Rautela) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रिषभ पंत (Rishabh Pant) याचा फोटो पोस्ट केला होता. तसेच, त्यासोबत एक मेसेजही लिहिला होता. मीरा रौतेला यांच्या या पोस्टनंतर युजर्सनी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिलाच सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
मीरा रौतेला यांची पोस्ट
मीरा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर रिषभचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, “सोशल मीडियावरील अफवा एकीकडे आणि तुम्ही लवकर बरे होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव रोशन करणे दुसरीकडे. सिद्दबली बाबा तुला आशीर्वाद देवो. तुम्ही सर्व लोक प्रार्थना करा.”
https://www.instagram.com/p/Cm04ZG9PM_V/?hl=en
युजर्सच्या कमेंट्स
मीरा यांनी पोस्ट करताच नेटकऱ्यांनी उर्वशीला धारेवर धरण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, “ही माणुसकी तुमच्या मुलीमध्ये असायला पाहिजे होती.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “उर्वशी तुझ्या खऱ्या अकाऊंटवरून ये.” आणखी एकाने लिहिले की, “जावई लिहिण्यास विसारलात.” एक जण असेही म्हणाला की, “जावई बरा होईल, टेन्शन घेऊ नका.” याव्यतिरिक्त इतर युजर्सनीही या पोस्टवर उर्वशीबद्दल कमेंट्स केल्या आहेत.
रिषभ पंतचा अपघात
खरं तर, भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याचा शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) दिल्ली- डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला होता. त्याची गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकल्याने ही घटना घडली होती. यादरम्यान त्याच्या गाडीने पेटही घेतला होता. पंत त्याच्या आईला सरप्राईज देण्यासाठी रुडकी येथे जात होता. या अपघातानंतर पंतला बस ड्रायव्हरने वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. पंतला या अपघातादरम्यान डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. (actress urvashi rautela mother meera rautela asks fans to pray for rishabh pant netizens troll)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“विराट-रोहितच्या भरवश्यावर राहू नका”, भारतीय दिग्गजाने संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल
हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, “स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची…”