---Advertisement---

विराट कोहलीला तब्बल ७ वेळा बाद करणारा खेळाडू आता आरसीबी संघात झाला सामील

On: मंगळवार, सप्टेंबर 1, 2020 11:20 AM
---Advertisement---

मुंबई । आयपीएल 2020 च्या 13 व्या हंगामास अजून 18 दिवस शिल्लक आहेत. यापूर्वी काही संघांना जोरदार झटका बसला आहे. पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैना आयपीएलचा हंगाम सोडून भारतात परतला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मोठा धक्का बसला आहे.

आरसीबीचा स्टार गोलंदाज केन रिचर्डसनने या हंगामात आयपीएलमधून माघार घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे त्याने माघार घेतली असल्याचे सांगितले जात आहेत. रिचर्डसन लवकरच वडील होणार असून त्याला आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवायचा आहे, असे आरसीबीने ट्विट केले आहे. याच कारणास्तव तो स्पर्धेतून खेळणार नाही. रिचर्डसनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम जॅम्पाचा आरसीबीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

28 वर्षीय रिचर्ड्स, 2016 मध्ये आरसीबीमध्ये सामील झाला. आयपीएल 2020 साठी, त्याला पुन्हा एकदा फ्रँचायझींनी लिलावात चार कोटींमध्ये विकत घेतले होते. त्याच वेळी, लिलावात जॅम्पाला कोणताही खरेदीदार सापडला नव्हता. त्याची बेस प्राईज दीड कोटी रुपये होती. जॅम्पा आल्यामुळे आरसीबीचा फिरकी गोलंदाजी विभाग खूप मजबूत झाला आहे. या संघात आधीच युजवेंद्र चहल, मोईन अली आणि पवन नेगी असे फिरकी गोलंदाज आहेत.

जॅम्पा ठरला होता विराटची डोकेदुखी –

जॅम्पाने विराटला नजीकच्या काळात खूप त्रास दिला आहे. त्याने विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 वेळा बाद केले आहे. जॅम्पा आणि विराट आत्तापर्यंत 13 वनडे सामन्यात आमने-सामने आले आहेत. यातील ५ सामन्यात झम्पाने विराटला बाद केले आहे. तसेच 8 टी20 सामन्यात हे दोघे आमने-सामने आले आहेत. यात जॅम्पाने टी20 मध्ये 2 वेळा विराटला बाद केले आहे.

आरसीबीने तयारी सुरू

जॅम्पा अद्याप संघात दाखल झ‍ालेला नाही, पण आरसीबीच्या अन्य सदस्यांनी त्यांचा क्‍वारंटीनचा वेळ पूर्ण करून सराव करण्यास सुरवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही संघात दाखल झाले आहेत. आरसीबी संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ऍरॉन फिंच यांच्यासह अनेक स्टार खेळाडू आहेत, परंतु अद्याप संघाला एकही विजेतेपद मिळवता आले नाही. संघाने तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे.

आरसीबी सलामीचा सामना खेळू शकते

आरसीबी 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सबरोबर आयपीएल 2020 सलामीचा सामना खेळू शकेल, अशी चर्चा आहे.  यापूर्वी चेन्नई सुपर किग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होण्याची अपेक्षा होती, परंतु चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्य‍ाने ते पहिला सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. आयोजकांनाही पहिल्या सामन्यात स्टार खेळाडूंना खेळताना पहायचे आहे. अशा परिस्थितीत पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली समोरासमोर येऊ शकतात अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, पहा कसा आहे संघ

महिन्याकाठी १० हजार कमावणाऱ्या घरातील सोनू ते सुरेश रैना बनण्यामागील मोठा संघर्ष

कर्णधार म्हणून मॉर्गन ‘या’ विक्रमाच्या यादीत ठरला नंबर वन; विराट-रोहितलाही टाकले मागे

ट्रेंडिंग लेख –

तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट

इंडियन क्रिकेट लीग अर्थात ‘वादग्रस्त आयसीएल’मुळे करियरचं मोठं नुकसान झालेले ५ क्रिकेटर

आयपीएलमध्ये कर्णधार तर अनेक झाले, पण यश मात्र या ५ जणांनाच मिळाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---