४ ते १६ सप्टेंबर दरम्यान इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार आहे. टी२० मालिका साऊथँम्पटन येथे आणि वनडे मालिका मँचेस्टर येथे होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी आज(३१ ऑगस्ट) इंग्लंडने त्यांचे संघ घोषित केले आहेत.
इंग्लंडच्या टी२० आणि वनडे अशा दोन्ही संघाचे कर्णधारपद ओएन मॉर्गनकडे असेल. तर या दोन्ही संघात जोफ्रा आर्चर, जॉस बटलर आणि मार्क वूडचे पुनरागमन झाले आहे. तर वनडे संघात जो रुट आणि ख्रिस वोक्सचे पुनरागमन झाले आहे. पण रुट आणि वोक्स टी२० संघात नाहीत.
सध्या इंग्लंड कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी वेगवेगळे संघ खेळवत होता. पण आता कसोटी संघातील रुट, वोक्स, आर्चर अशा काही खेळाडूंना त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संघात स्थान दिले आहे.
याबरोबरच दुखापतीमुळे जेसन रॉयला संघात स्थान मिळालेले नाही. तर अष्टपैलू बेन स्टोक्स त्याच्या कुटुंबासमवेत न्यूझीलंडला असल्याने त्याचाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांसाठी इंग्लंड संघात समावेश नाही. त्याच्या वडिलांना ब्रेन कॅन्सर झाला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघ –
ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, टॉम बंटन, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, जो डेन्ली, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मालन, आदिल राशिद, मार्क वुड.
राखीव खेळाडू – लियाम लिव्हिंगस्टोन, साकीब महमूद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ –
ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, टॉम बंटन, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, आदिल राशिद, जो रूट, ख्रिस वॉक्स, मार्क वुड.
राखीव खेळाडू – जो डेन्ली, साकीब महमूद
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिका वेळापत्रक (साऊथँम्पटन) –
४ सप्टेंबर – पहिला टी२० सामना – वेळ: रात्री १०.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
६ सप्टेंबर – दुसरा टी२० सामना – वेळ: संध्याकाळी ०६.४५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
८ सप्टेंबर – तिसरा टी२० सामना – वेळ: रात्री १०.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक (मँचेस्टर) –
११ सप्टेंबर – पहिला वनडे सामना – वेळ: संध्याकाळी ०५.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
१३ सप्टेंबर – दुसरा वनडे सामना – वेळ: संध्याकाळी ०५.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
१६ सप्टेंबर – तिसरा वनडे सामना – वेळ: संध्याकाळी ०५.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार म्हणून मॉर्गन ‘या’ विक्रमाच्या यादीत ठरला नंबर वन; विराट-रोहितलाही टाकले मागे
इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावलेल्या बाबर आझमने केली विराट-फिंचच्या विश्वविक्रमाची बरोबरी
आमचा एक वॉट्सऍप ग्रुप आहे, त्यातूनच मला…. सीएसकेच्या स्टार खेळाडूचा मोठा खुलासा
ट्रेंडिंग लेख –
तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट