fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२०१९ विश्वचषकासाठी असा आहे १५ जणांचा अफगाणिस्तान संघ

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी आज अफगाणिस्तानने 15 जणांचा संघ घोषित केला आहे. 23 एप्रिल ही विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ घोषित करण्याची अंतिम तारीख आहे.

आज जाहीर झालेल्या अफगाणिस्तानच्या संघात माजी कर्णधार असगर अफगाणचाही समावेश करण्यात आला आहे. त्याला काही दिवसांपूर्वी आफगाणिस्तान संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्याच्याऐवजी वनडे संघाचे नेतृत्व गुलाबदीन नाईबकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे विश्वचषकातही नाईब अफगाणिस्तानचे नेतृत्व करेल.

या बरोबरच अफगाणिस्तान संघात हमिद हसनचे पुनरागमन झाले आहे. 31 वर्षीय हसन हा जूलै 2016 ला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. तो मागील काही काळापासून दुखापतींचा सामना करत आहे. तसेच विश्वचषकाआधीही त्याच्या फिटनेसवर सर्वांचेच लक्ष असेल.

त्याच्याबद्दल अफगाणिस्तान क्रिकेटच्या निवड समीतीचे अध्यक्ष दौलत खान अहमदजाई म्हणाले, ‘आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की अनुभवी वेगवान गोलंदाज हमिद हसनचे पुनरागमन होत आहे. असे असले तरी आगामी सराव सामन्यांमध्ये त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर पूर्ण लक्ष दिले जाईल.’

अफगाणिस्तानच्या या 15 जणांच्या संघात राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रेहमान, मोहम्मद शहजाद, समिउल्लाह शिनवारी असे स्टार खेळाडू देखील आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

2019 विश्वचषकासाठी असा आहे अफगाणिस्तानचा संघ – 

गुलाबदीन नाईब (कर्णधार), मोहम्‍मद शहजाद(यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हजरतुल्‍लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्‍लाह शाहीदी, नजीबुल्‍लाह झादरान, समिउल्‍लाह शिनवारी, मोहम्‍मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.

महत्त्वाच्या बातम्या – 

एमएस धोनी आयपीएलमध्ये ही खास ‘डबल सेंच्यूरी’ करणारा पहिला भारतीय

न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू जेनसन ऑस्ट्रेलियाई गर्लफ्रेंडबरोबर अडकली विवाहबंधनात

You might also like