अफगाणिस्ताननं बुधवारी टी20 विश्वचषक 2024 साठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाचं नेतृत्व करताना दिसेल. याशिवाय आयपीएल 2024 मध्ये सहभागी 8 खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानचं कर्णधारपद भूषवणाऱ्या हशमतुल्ला शाहिदीला संघात स्थान मिळालेलं नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं सोशल मीडियाच्या माध्यमातून संघाची घोषणा केली. अफगाणिस्ताननं 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी हजरतुल्ला झाझई, सेदीकुल्लाह अटल आणि मोहम्मद सलीम साफी यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला आहे.
सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेले राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मोहम्मद नबी, रहमानउल्ला गुरबाज आणि गुलबदीन नायब हे अफगाणिस्तानच्या टी20 विश्वचषक संघात आहेत. संघात रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झद्रान आणि मोहम्मद इशाक हे चार फलंदाज आहेत. शिवाय सहा अष्टपैलू खेळाडूंनाही स्थान मिळालं आहे.
राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात आणि नांगेयालिया खरोटी हे अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत असतील. तर मुजीब उर रहमान आणि नूर यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. त्यांना रशिद, नबी आणि खरोटी यांची साथ मिळेल. नवीन उल हक, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल.
टी20 विश्वचषकात अफगाणिस्तानला ‘क’ गटात ठेवण्यात आलं आहे. या गटात अफगाणिस्तानसह न्यूझीलंड, सह-यजमान वेस्ट इंडिज, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघ 3 जून रोजी युगांडाविरुद्ध स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
2024 टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ पुढीलप्रमाणे –
राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांग्याल खरोटी, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक
राखीव खेळाडू – सेदीकुल्ला अटल, हजरतुल्ला झाझई, मोहम्मद सलीम साफी
महत्त्वाच्या बातम्या –
दुखापतग्रस्त मयंक यादवला जसप्रीत बुमराहकडून मिळाल्या खास टिप्स! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर, रोमांचक सामन्यात लखनऊविरुद्ध पराभव