आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटलावर सर्वात वेगाने प्रगती करणारा संघ म्हणून अफगाणिस्तानकडे पाहिले जाते. अवघ्या १२ वर्षाच्या कालावधीत या संघाने संघ तयार करण्यापासून प्रस्थापित विरोधी संघांना धक्का देण्यापर्यंत जो प्रवास केला आहे, तो थक्क करणारा आहे. अनेक शानदार खेळाडूंनी हा प्रवास सुखकर गेला. मात्र, देशातील राजकीय परिस्थितीमुळे पुन्हा एकदा अफगाणिस्तान क्रिकेटचा दर्जा खाली घसरतो की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सध्या देशातील अनेक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित झाले आहेत. अशा छावण्यांमध्ये असलेल्या मुलांमध्ये देखील क्रिकेटबद्दलचे प्रेम दिसून येत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात छावणीमधील ही मुले क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत.
पुन्हा एकदा दिसले अफगाणिस्तानचे क्रिकेटप्रेम
तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशातील बहुसंख्य नागरिक देशाबाहेर गेले आहेत. तर, काहींनी शेजारील पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला असून, तेथे ते छावण्यांमध्ये राहतात. त्यातील एका छावणीमधील एक व्हिडीओ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला. यामध्ये काही लहान मुले क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की,
‘अफगान मुलांचे क्रिकेटसाठीचे समर्पण पाहा. मागील काही वर्षात अनेक शानदार खेळाडूंनी या मुलांना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली आहे. हे चित्र खूप आशादायी आहे.’
Video: Watch the grit & courage of Afghan kids towards 🏏. As it has turned down to be the sole source of joy in 🇦🇫. The rise of some prominent players over the last decade inspired the youngsters to play, watch & follow the game very closely, which is very promising to see. pic.twitter.com/N2Ua8FK2mb
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 1, 2021
अफगाणिस्तानमधील स्थिती वाईट
जुलै महिन्यात अमेरिकेचे सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. तेव्हापासून त्यांनी अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. अफगानिस्तान महिलांना क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानने मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान यांच्यासारख्या खेळाडूंचा जोरावर नाव कमावले होते. असे असले तरी देशातील परिस्थितीमुळे अफगाणिस्तान संघाला कधी पाकिस्तान तर कधी भारतात सराव करावा लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
इतकं कोण करतं ना? विराटचं कौतुक करावं तितकं कमीच, आरसीबीसाठी स्वत:च्या पगारात केली कपात
केवळ पैशासाठी नाते तोडून गेला राशिद? काय घडले सनरायझर्सच्या गोटात? वाचा सविस्तर
विराटने घेतली शपथ; म्हणाला, ‘आरसीबीसोबत पुढील ३ वर्षे घालवायची आहेत, अजून माझं बेस्ट देणं बाकी आहे’