दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाण याने दुसऱ्यांदा आपला साखरपुडा उरकल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू मुजीब उर रहमान हा देखील विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघातील त्याचे संघ सहकारी मोहम्मद नबी आणि माजी कर्णधार गुलबदीन नईब हे या व्हिडिओमध्ये नृत्य करताना दिसत आहेत.
गेल्या वर्षी झाला होता साखरपुडा
टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेला मुजीब १९ वर्षांचा आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याचा साखरपुडा झाला होता. मुजीबने आतापर्यंत ६० आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यात ८९ बळी घेण्यात त्याला यश लाभले. मुजीबने २०१८ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात दमदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. राशिद खानसह तो अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतो.
आयपीएल २०२० मध्ये ठरला होता अपयशी
मुजीब नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दिसला होता. पंजाबला स्पर्धेत प्ले-ऑफपर्यत मजल मारण्यात अपयश आले होते. पंजाब संघ स्पर्धेत फक्त ६ विजय मिळवून गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिला. मुजीबला संपूर्ण स्पर्धेत अवघे २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या दोन्ही सामन्यात तो खूप महागडा ठरला. त्याने दोन सामन्यात ८३ धावा लुटवल्या होत्या. पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मुजीब ऐवजी रवी बिश्नोई आणि एम अश्विन या भारतीय लेगस्पिनरना अधिक संधी दिली होती.
#Afghanistan cricket players dancing in @Mujeeb_R88 wedding’s party. @GbNaib pic.twitter.com/7ZC4nzphNR
— Jafar Haand (@jafarhaand) November 13, 2020
टी२० क्रिकेटचा प्रसिद्ध फिरकीपटू आहे मुजीब
वीस वर्षाचा होण्याआधीच, मुजीब टी२० क्रिकेटमधील प्रसिद्ध गोलंदाज बनला आहे. राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त मुजीब विविध देशांमध्ये जाऊन व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळत असतो. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब व्यतिरिक्त तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका तलावाह्ज संघाचे प्रतिनिधित्व करतो. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळताना तो दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर




