टी-२०विश्वचषकानंतर (T20 World Cup) प्रत्येक संघ वेगवेगळ्या दौऱ्यावर आहे. तसेच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने (Afghanistan Cricket Board) सुद्धा त्यांच्या २०२२-२३ हंगामातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलंय. विशेष म्हणजे यात अफगाणिस्तानचा भारत दौरा (Afghanistan Tour Of India) सुद्धा आहे. या दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
भारत-अफगाणिस्तान खेळणार पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका
अफगाणिस्तानच्या वेळापत्रकानुसार ते भारताविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळतील. हा दौरा पुढच्या वर्षी मार्च महिन्यात होणार आहे. या दोन संघांमध्ये अजूनपर्यंत द्विपक्षीय मालिका खेळवली गेली नाही. दोन संघ फक्त वनडे विश्वचषक आणि आशिया कप स्पर्धेत आमने-सामने आले आहे. आणि आता हे दोन संघ पहिल्यांदा द्विपक्षीय मालिकेत खेळणार आहेत.
We are pleased to announce our FTP schedule for 2022-23. This includes a total of 37 ODIs, 12 T20Is & 3 tests in the period. Moreover, the national team will be taking part in various ICC & ACC events in two years.
More: https://t.co/QObIpDclje@ICC pic.twitter.com/KoujvfTlRi— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 13, 2021
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वेळापत्रक घोषित केले आहे. संघ कुठल्या दौऱ्यांवर जाणार आहे, हे सगळं जाहीर केलंय. या वेळापत्रकानुसार असं लक्षात येत आहे की बलाढ्य संघांसोबत अफगाणिस्तान संघ खेळणार आहे. अफगाणिस्तान भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्टइंडीज आणि पाकिस्तान संघासोबत खेळणार आहे.
यादरम्यान अफगाणिस्तान संघ ३ कसोटी सामने, ३७ एकदिवसीय सामने आणि १२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. यात आशिया कप (Asia Cup) आणि आयसीसी स्पर्धांचे सामनेसुद्धा समाविष्ट आहे.
२०१८ मध्ये भारत दौऱ्यावर आलेला अफगाणिस्तान संघ
साल २०१८ नंतर अफगाणिस्तान पहिल्यांदा भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान संघ ४ वर्षांनी भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान २०१८ मध्ये दौऱ्यावर कसोटी सामना खेळण्यासाठी आला होता. त्या सामन्यात अफगाणिस्तानचा दारुण पराभव झाला. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि मुरली विजय (Murali Vijay) यांनी शतक ठोकून भारताला एक डाव राखून २६२ धावांनी विजय मिळवून दिला होता. सामन्यात फिरकीपटूंचं वर्चस्व होतं. फिरकीपटू अश्विनने ५ तर जडेजाने ६विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई टू दक्षिण आफ्रिका!! भारतीय संघातील खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना, फोटो व्हायरल
‘जोकर’, ‘दयाबेन’ आणि बरंच काही! विराटच्या पत्रकार परिषदेनंतर भन्नाट मिम्स व्हायरल
“कुलदीप कर्णधार आणि प्रशिक्षकांचा आवडता खेळाडू नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं”