अफगाणिस्तान क्रिकेट संघाला चालू महिन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. या महत्वाच्या मालिकेआधी अफगाणिस्तानने त्यांच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज राहिलेला हामिद हसन याने निवृत्ती जाही करताच त्याला गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले. पुढच्या एक वर्षासाठी आता हामिद हसन उमर गुलची गाजा घेणार आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुल (Umar Gul) मागच्या एक वर्षापासून अफगाणिस्त संघाच्या (Afghanistan Cricket Team) गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडत होता. यावर्षी अफगाणिस्तान संघासोबतचा त्याचा करार संपला आणि क्रिकेट बोर्डाने हा करार इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. अशात हामित हसन (Hamid Hassan) याला अफगाणिस्तानच्या नवीन गोलंदाजी प्रसिक्षकाच्या रूपात नियुक्त केले गेले आहे. हामिद हसनचा संघासोबतचा करार देखील एक वर्षाचाच असेल.
अफगाणिस्तान संघाला हमिद हामिद हसनच्या रूपात नवीन गोलंदाजी प्रशिक्षक मिळाला आहे. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जुनेच असतील. मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रोट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन मरोन यांचा संघासोबतचा करार पुढे वाढवला गेला आहे. अफगाणिस्तन संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनल्यानंतर हामिद म्हणाला, “मागच्या दोन-तीन दशकांपासून क्रिकेट हेच माझे आयुष्य राहिले आहे. ज्या खेळावर सर्वात जास्त प्रेम केले, त्यातून निवृत्ती घेणे अवघड होते. पण मी आपल्या देशासाठी हा निर्णय घेत आहे.”
🚨 ANNOUNCEMENT 🚨
Afghanistan's Fast Bowling Great @hamidhassanHH retired from International Cricket and has been named as AfghanAtalan's New Bowling Coach. 🤩
Read More: https://t.co/Lya4iWQZW1 pic.twitter.com/HPFihVzc5Q
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) March 8, 2023
गोलंदाजी प्रशिक्षकपद सोपवले गेल्यानंतर हामिद असेही म्हणाला की, “मला राष्ट्रीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी मिळाली, याचा अभिमान आहे. मी या संघासोबत संघासोबत माझ्या कारकिर्दीचा आनंद घेतला आहे. आपल्या युवा खेळाडूंसोबत काम करण्यासाठी मी वाट पाहत आहे. मी संघातील वेगवान गोलंदाजांना जवळून पाहत आलो आहे आणि आता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे. संघाचे गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत करण्यासाठी मी काम करेल.” दरम्यान हामिद हसनने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध 2021 विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. तर 2019 वनडे विश्वचषकात त्याने स्वतःचा शेवटचा वनडे सामना खेळला होता.
(Afghanistan’s Hamid Hasan has retired from international cricket and has now become the team’s bowling coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-