क्रिकेटमध्ये आपण आतापर्यंत अनेक खेळाडूंनी विश्रांती घेतलेली पाहिले आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे, मानसिक आरोग्यामुळे, तर काहींनी मागच्या दोन वर्षात बायो बबलमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता एक खेळाडू असा समोर आला आहे, ज्याने आगामी २०२२ टी२० विश्वचषकाच्या (t20 world cup 2022) पार्श्वभूमीवर एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. हा खेळाडू आहे अफगाणिस्तान संघाचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक (naveen ul haq). नवीनने गुरुवारी (६ जानेवारी) टी२० विश्वचषकापर्यंत तो एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही, अशी घोषणा केली.
नवीन उल हकला अफगाणिस्तान संघाचा गोलंदाजी आक्रमणाचा महत्वाचा भाग मानले जाते. एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या दिलेल्या माहितीनुसार, नवीन उल हकने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डला सांगितले आहे की, तो टी२० क्रिकेट खेळत राहणार आहे. यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. परंतु, त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याचे जाहीर केल्यानंतर एक गोष्ट साफ झाली आहे की, तो भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिकेत सहभाग घेणार नाही.
दरम्यान, नवीन अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त विदेशातील टी२० लीगमध्येही सहभाग घेत आला आहे. सीपीएलमध्ये तो गयाना वॉरियर्स संघाचा भाग आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये तो सिल्हेट थंडर संघाचा भाग आहे. तसेच लंका प्रीमियर लीगमध्ये तो कोलंबो स्टार्स आणि कँडी टस्कर्स संघासाठी खेळला आहे.
राष्ट्रीय संघाचा विचार केला तर, नवीन अफगाणिस्तानच्या एकदिवसीय आणि टी२० संघाचा २०१६ पासून भाग आहे. त्याने २०१९ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. हा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८ विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या आहेत.
तत्पूर्वी, अनेकदा भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि नवीन उल हक यांची एकमेकांसोबत तुलना केली गेली आहे. नवीन आणि बुमराहाची गोलंदाजी करण्याची एक्शन जवळपास एकसारखी आहे. नवीनचा चेंडू देखील बुमराहप्रमाणेच खेळपट्टीवर पडल्यानंतर वेगाने आतमध्ये वळतो. त्यासोबत तो संथ गतीचा चेंडूही चांगल्या प्रकारे टाकतो.
महत्वाच्या बातम्या –
जोहान्सबर्ग कसोटीत कोणीही जिंको, इतिहास तर घडणार! का? वाचा सविस्तर
‘लॉर्ड’ उपाधी मागील खरे कारण काय? का मिळतंय घवघवीत यश? शार्दुल ठाकूरनेच केलाय खुलासा
व्हिडिओ पाहा –