क्रिकेट मैदानावरील चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी दोन्ही संघातील खेळाडूंना एकाच संघाकडून खेळताना पाहण्याची संधी मिळाली, तर जागतिक क्रिकेटच्या कोणत्याही चाहत्याला हा क्षण चुकवायचा नसेल. शेवटच्या वेळी असेच काहीसे 2007 मध्ये दिसले होते. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आफ्रो-आशिया कपमध्ये एकत्र खेळताना दिसले होते. आता 17 वर्षांनंतर पुन्हा ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासंदर्भात आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे अंतरिम अध्यक्ष म्हणजे तवेंगवा मुकुहलानी यांनी ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी एक मोठी अपडेट दिली आहे.
आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनने आफ्रो-आशिया चषक पुन्हा सुरू करण्यासाठी 6 सदस्यांची अंतरिम समिती देखील स्थापन केली आहे. जेणेकरून स्पर्धा आयोजित करण्याची पुढील प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते. आफ्रो-आशिया चषक आयोजित करण्याच्या संधी शोधण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेशी बोलणे हे त्याचे पहिले उद्दिष्ट असेल. ही स्पर्धा आतापर्यंत फक्त दोन वेळा खेळली गेली आहे, पहिल्यांदा 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेने यजमानपद भूषवले होते. तर दुसऱ्यांदा 2007 मध्ये भारताने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेची तिसरी आवृत्ती 2009 मध्ये केनियामध्ये होणार होती. परंतु दोन दशकांनंतरही ती होऊ शकली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील खराब संबंध. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिकाही होत नाही.
आफ्रो-आशिया कप हा एक आंतरखंडीय कप आहे. जो आशिया आणि आफ्रिकेतील खेळाडूंनी बनलेल्या दोन संघांमध्ये आयोजित केला जातो. ज्यामध्ये दोघांमध्ये 3-3 सामन्यांची मालिका खेळली जाते. मुकुहलानी, जे झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत, यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, क्रिकेट व्यतिरिक्त, आफ्रो-आशिया चषक संस्थेला अत्यंत आवश्यक आर्थिक स्थैर्य आणते. जे सर्वांसाठीच फायदेशीर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, माजी दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!
IPL 2025; संघाने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने अनफाॅलो करत फोटोही केले डिलीट
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये शतक ठोकणारे भारतीय फलंदाज