कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील अनेक स्पर्धांवर याचा परिणाम झाला आहे. टोकियोमध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहेत. तसेच आयपीएल, एनबीए आणि युरोपियन फुटबॉल लीगबरोबरच अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे व्हायरसविरुद्धच्या लढाईत जगभरातील प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तींनी हातभार लावला आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू आपापल्या परीने होईल ती मदत देण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामध्ये बीसीसीआयने (BCCI) ५१ कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) बुधवारी (१ एप्रिल) रामकृष्ण मिशनच्या बेलूर (Belur) येथील मुख्यालयात जाऊन गरजू व्यक्तींना २००० किलो तांदुळ (2000 Kg Rice) दान केले.
गांगुलीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, ” मी २५ वर्षांनंतर बेलूर मठामध्ये आलो आहे. गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी मी २००० किलो तांदूळ देत आहे.”
Visited belur math after 25 years .. handed over 2000kgs of rice for the needy pic.twitter.com/FcIqHcWMh7
— Sourav Ganguly (@SGanguly99) April 1, 2020
यावेळी गांगुलीने मठातील पुजाऱ्यांबरोबर गोल्फ कोर्टवर बसून संपूर्ण मठ पाहिला.
यापूर्वी गांगुलीने घोषणा केली होती की, तो कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पहाता गरजू व्यक्तींना ५० लाख रुपयांंचे तांदळाचे वाटप करणार आहे.
या व्हायरसविरुद्धच्या लढाईत बीसीसीआयबरोबरच विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे तसेच अनेक क्रिकेटपटूंनी यामध्ये मदतीचा हात दिला आहे.
याबरोबरच जोगिंदर शर्मा २००७ साली झालेल्या टी२० विश्वचषकाचा हिरो सध्या हरियाणा पोलिसांत डीएसपी पदावर कार्यरत आहे. तो सध्या या व्हायरसविरद्धच्या लढाईत रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन करत आहे. आयसीसीने त्याची प्रशंसा करत त्याला खरा हिरो देखील म्हटले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-७ बाप-लेकांच्या जोड्या, ज्यांनी गाजवलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त झिरो
-धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
-गद्दार म्हणणाऱ्यांना युवराजची सणसणीत चपराक
-डकवर्थ-लुईस नियमाचा शोध लावणाऱ्या टोनी लुईसचे निधन