---Advertisement---

आता बहुधा फक्त भारतीय खेळाडूच खेळणार उर्वरित आयपीएल हंगाम, ‘या’ कारणामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ

On: गुरूवार, मे 13, 2021 2:34 PM
---Advertisement---

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने शेवटचा पर्याय म्हणून आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय, ही स्पर्धा टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या आधी खेळवण्याच्या प्रयत्नात आहे.स्पर्धेतील २९ सामने झाले असून ३१ सामने शिल्लक आहेत. परंतु इंग्लंडचे खेळाडू आयपीएलचे उर्वरित सामने खेळणार नाहीये. तसेच आता आणखी एका देशातील खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड संघ यूएई मध्ये पाकिस्तानी संघाविरुद्ध मालिका खेळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये तीन वनडे सामने आणि तीन टी -२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच आयपीएलचे उर्वरित सामने देखील याच महिन्यात खेळवण्यात येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघातील खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसतील. आयपीएल स्पर्धेत सनराइजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियमसन, मुंबई इंडियंसचा स्‍टार गोलंदाज ट्रेंट बोल्‍ट तसेच चेन्‍नई सुपर किंग्ज संघाचा फिरकी गोलंदाज मिचेल सेंटनर या स्पर्धेत उपलब्ध नसेल.

इंग्लंड संघ येणाऱ्या पुढील काही महिन्यात व्यस्त असणार आहे .त्यामुळे इंग्लंड संघातील खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. इसीबीचे क्रिकेट निर्देशक एशले जाइल्स यांनी माहिती दिली की,आयपीएलच्या बायो बबल मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. एकतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी हे सामने पुन्हा आयोजित करण्यात येऊ शकतात. तसेच या वेळी इंग्लंड संघातील शीर्ष खेळाडू व्यस्त असणार आहेत. त्यांना सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये बांगलादेश संघाचा दौरा करायचा आहे.

तसेच टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲशेसचा थरार रंगणार आहे. जाइल्सने इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आमचा कार्यक्रम व्यस्त आहे.आयपीएलच्या वेगवेगळ्या संघातून इंग्लंडचे ११ खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळतात. आयपीएलचे उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार आहेत. याबाबत कुठलाही खुलासा केला गेला नाहीये. या हंगामात न्यूझीलंड संघाविरुद्ध सामने असल्यामुळे आमचे खेळाडू व्यस्त असणार आहेत. त्यानंतर ॲशेस आणि टी -२० विश्वचषक स्पर्धा देखील खेळायची आहे.” त्यामुळे आता उर्वरित आयपीएल हंगाम खेळवला गेला तरी त्यात बहुतेक फक्त भारतीय खेळाडूच खेळतील की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर काय होणार? वाचा आयसीसीचा नियम

फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---