इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला गेला. बीसीसीआयने यावर्षी पहिल्यांदाच आयपीएल लिलाव भारताबाहेर आयोजित केला. दिल्लीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक खेळाडूंचे नशीब रात्रीत चमकल्याचे पाहायला मिळाले. मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
आयपीएल 2024 हंगामात पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे. तब्बल 20.50 कोटी रुपयांची बोली लावून हैदराबाद फ्रँचायझीने कमिन्सला आपल्या ताफ्यात सामील केले. मागच्या आयपीएल हंगामात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करून याने सर्व विक्रम मोडत 18.50 कोटी रुपये मिळवले होते. पण नुकताच वनडे विश्वचषक जिंकणारा कर्णधार पॅट कमिन्स याला खरेदी करण्यासाठी हैदराबादने यावेळी कुठलीच कसर सोडली नाही. कमिन्स आगामी हंगामात हैदराबादचा कर्णधार देखील बनू शकतो.
कमिन्सने मंगळवारी सॅम करन याचा विक्रम मोडला. पण त्याच्याच सहकारी खेळाडू मिचेल स्टार्क याने कमिन्सचा विक्रम अवघ्या 90 मिनिटांच्या आत मोडीत काढला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. म्हणजेच स्टार्क आयपीएल इतिहिसातील सर्वात महागडला घेळाडू ठरला. (After IPL 2015 players got lucky! See the most expensive player of every season)
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे क्रिकेटर्स
२४.७५ कोटी – मिचेल स्टर्क, केकेआर, २०२४
२०.५० कोटी- पॅट कमिन्स,हैदराबाद, २०२४
१८.५० कोटी- सॅम करन, पंजाब, २०२३
१७.५० कोटी- कॅमेरुन ग्रीन, मुंबई, २०२३
१६.२५ कोटी- बेन स्टॉक्स, चेन्नई, २०२३
१६.२५ कोटी- ख्रिस मॉरिस, राजस्थान, २०२१
१६.०० कोटी- युवराज सिंग, दिल्ली, २०१५
१६.०० कोटी- निकोलस पुरन, लखनऊ, २०२३
१५.५० कोटी- पॅट कमिन्स- केकेआर, २०२०
मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये खेळाडूंवर आयपीएल फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करताना दिसत आहेत. आयपीएल 2015 आधाची एकही फलंदाज पहिल्या 9 महागड्या खेळाडूंमध्ये नाहीये.
महत्वाच्या बातम्या –
अजब! पराभव पाकिस्तानचा पण फायदा झाला टीम इंडियाला, पाहा नक्की घडलं तरी काय!
हर्षल पटेलचं नशीब फळफळलं! 2 Crore बेस प्राईजचे झाले तब्बल ‘एवढे’ कोटी, पंजाबने दाखवला विश्वास