भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो केला. तर या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर थ्रो करत ऑलिम्पिकमध्ये नवा विक्रम केला. वास्तविक आता नीरज चोप्रा संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे.
नीरज चोप्रा आता पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पहायला मिळणार आहे. 22 ऑगस्ट रोजी नीरज लुसेन डायमंड लीगमध्ये भाला फेकताना दिसणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान नीरज चोप्राने सांगितले होते की, ब्रुसेल्स, बेल्जियम येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनलमध्ये त्याला खेळायचे आहे. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी, त्याला डायमंड लीगच्या एका लेगमध्ये खेळणे आवश्यक होते. ज्यासाठी त्याला एकतर 22 ऑगस्ट रोजी लुसेनमध्ये किंवा 5 सप्टेंबर रोजी झुरिचमध्ये भाग घ्यायचे होते. आता नीरजने लुसेन लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
#WATCH | On his plans post his Olympic stint, Neeraj Chopra says, “… I have finally decided to participate in the Lausanne Diamond League, which begins August 22.” pic.twitter.com/euMxssIYak
— ANI (@ANI) August 17, 2024
नीरज चोप्रा एका मुलाखतीत म्हणाला, ‘पहिल्यांदा मी विचार करत होतो की मी झुरिच डायमंड लीग आणि नंतर अंतिम डायमंड लीगमध्ये भाग घेईन. चांगली गोष्ट म्हणजे पॅरिसनंतर फारशा दुखापती झाल्या नाहीत. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान ईशान भाई (फिजिओ) यांनी उपचार केले होते. कोणतीही अडचण आली तरी ती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली. मागच्या वेळीही मला शस्त्रक्रियेसाठी विचारण्यात आले होते, पण मी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये पदके जिंकली होती. पॅरिस ऑलिम्पिकनंतर ईशान भाऊ उपचार देऊन घरी परतला आहे. मी 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लुसेन डायमंड लीगमध्ये सहभागी होण्याचे ठरवले आहे. कारण आत्ता खूप बरं वाटत आहे.
डायमंड लीगची फायनल 13 आणि 14 सप्टेंबरला ब्रसेल्समध्ये होणार आहे. प्रत्येक ॲथलीटला डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रथम क्रमांकासाठी 8, द्वितीय क्रमांकासाठी 7, तिसऱ्या स्थानासाठी 6 आणि चौथ्या स्थानासाठी 5 गुण दिले जातात. झुरिचमध्ये 2022 मधील ग्रँड फिनाले जिंकल्यानंतर नीरज डायमंड लीग चॅम्पियन बनणारा पहिला भारतीय ठरला.
हेही वाचा-
नीरज चोप्रा 90 मीटरचा टप्पा कधी ओलांडणार? गोल्डन बॉय स्वतः म्हणाला…
किंग कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण! पाहा ‘विराट’ कामगिरी
आली लहर केला कहर! आयुष बदोनीचा रिषभ पंतच्या संघाला दे धक्का