विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाने हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच त्यांनी चार सामने जिंकले आणि उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या इतक्या जवळ पोहोचले. मात्र, उपांत्य फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निकराच्या सामन्यांमुळे पूर्ण होऊ शकले नाही. अफगाणिस्तान संघ रविवारी या स्पर्धेतील काही सर्वोत्तम आठवणी घेऊन त्यांच्या देशात परतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतर अफगाणिस्तान संघाने जबरदस्त पुनरागमन करत चार सामने जिंकले. त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभूत केले. अफगाणिस्तानचे चाहते संघाच्या जबरदस्त कामगिरीवर खूप खूश दिसत होते.
अफगाणिस्तानचा संघ रविवारी काबूल विमानतळावर पोहोचला. तेथे चाहत्यांनी फुलांचा हार घालून खेळाडूंचे उत्साहात स्वागत केले. यावेळी चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंसोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक दिसत होते. यानंतर जेव्हा खेळाडू कारमधून विमानतळावर वरून निघाले तेव्हा चाहत्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “आज संध्याकाळीच्या अफगाणिस्तान संघाच्या काबूलमध्ये आगमनाची क्षणचित्रे पहा.”
𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐇𝐨𝐦𝐞 𝐀𝐭𝐚𝐥𝐚𝐧𝐨! 🤩
Watch glimpses from AfghanAtalan's arrival to Kabul this evening. 🤩#AfghanAtalan | #CWC23 | #WarzaMaidanGata pic.twitter.com/gZA51NTdo0
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 12, 2023
अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) या स्पर्धेतील संघाच्या कामगिरीवर समाधानी दिसले आणि त्यांनी आशा व्यक्त केली की भविष्यात खेळाडूंचा एक मोठा समूह तयार केला जाईल. दक्षिण आफ्रिकेकडून सामना हरल्यानंतर तो म्हणाला होता, “बरं, आज इथे बसून वाटतं की आपण काही सामने जिंकू शकलो असतो. एक प्रशिक्षक आणि संघाचा सदस्य या नात्याने मला याचे दु:ख झाले आहे. गोलंदाजी ही अफगाणिस्तानची नेहमीच ताकद राहिली आहे पण यावेळी फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. ही पहिलीच वेळ आहे की आम्ही परिस्थितीनुसार संघ निवडण्याच्या स्थितीत होतो. अनेक खेळाडू फ्रँचायझी क्रिकेटमधून येत आहेत. भविष्य उज्ज्वल दिसत आहे आणि आमचे काम खेळाडूंना विकसित करणे आणि आमचे क्रिकेट योग्य दिशेने जात आहे याची खात्री करणे हे आहे.” (After returning from a strong performance in the World Cup the Afghanistan team received a warm welcome back home Watch the video)
म्हत्वाच्या बातम्या
Breaking: सेहवागसह 3 दिग्गजांना मिळाली ICC Hall of Fameमध्ये जागा, ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरने घडवला इतिहास
राहुल-श्रेयसने केली विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी, मोडला ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा 16 वर्षे जुना विक्रम