भारतीय संघाचा मागच्या वर्षभरात कर्णधारपदासाठी अनेक पर्याय समोर आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांनी भारताच्या कर्णधाराची भूमिका पार पाडली. रोहितच्या अनुपस्थितीत या दोघांनी एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली. हार्दिक पंड्या याला मागच्या काही महिन्यांमध्ये सतत रोहितचा उत्तराधिकारी म्हटले जात आहे. मात्र, भारताच्या एका माजी दिग्गजाने रोहितचा उत्तराधिकारी म्हणून एका नवीन नाव सुचवले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या 35 वर्षांचा आहे. मागच्या वर्षी विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर ही जबाबदारी रोहितच्या खांद्यावर सोपवली गेली. त्याच्या नेतृत्वात संघाने अनेक महत्वाच्या माहिकाही जिंकल्या. पण अलिकडे संघाला टी-20 प्रकारात नवीन कर्णधारीच आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यायंच्यासारख्या दिवग्गजांनी देकील ही गोष्ट मान्य केली आहे. अनेकांच्या मते रोहितनंतर हार्दिक पंड्या भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार बनू शकतो. हार्दिकने कर्णधारपदाच्या शर्यतीत रिषभ पंत आणि केएल राहुल यांनाही मागे टाकल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद जिंकले.
कर्णधाराच्या रूपात हार्दिकने भारतासाठीही काही मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पण संघाचे माजी कर्णधार मनिंदर सिंग (Manindar Singh) यांनी कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याेचे नाव घेतले आहे. मनिंदर सिंग म्हणाले की, “मी तीन-चार वर्षांपासून म्हणत आहे. तुम्हाला माहिती आहे श्रेयस अय्यर माझा आवडता खेळाडू आहे. मी जेव्हाही त्याला संघाचे नेतृत्व करताना पाहिले आहे, मग ते आयपीएल असो किंवा इतर कोणता सामना. त्याची खेळाप्रती असेलली समज चांगली दिसते. तो खूप सकारात्मकतेने खेळतो. तुम्हाला या गोष्टीची झल त्याच्या फलंदाजीत देकील पाहायला मिळते. जेव्हा कधी तो फलंदाजीसाठी मैदानात उतरतो, तेव्हा नेहमी धावा करण्याचा प्रयत्नात असतो. मी खेळपट्टीवर थांबेल आणि काही वेळाने धावा करेल, असा विचार करणाऱ्यांमधील तो नाही. त्याला चौकार मारता येत नसेल, तर तो संघाचा स्ट्राईक बदलत राहतो आणि मैदानात गॅप शोधताना दिसतो.”
“मला वाटते मी आधीही म्हटलो आहे की, हार्दिक पंड्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार बनू शकतो. पण श्रेयस अय्यरचे नाव माझ्या डोक्यात मागच्या तीन-चार वर्षांपासून आहे. मला खरोखर असे वाटते की, त्याला भारतासाठी खेळण्याच्या नियमित संधी मिळाल्या पाहिजेत. कारण त्या क्रिकेटची चांगली समज आहे,” असे मनिंदर सिंग म्हणत आहेत. (After Rohit Sharma, this player should become India’s captain instead of Hardik Pandya said Manindar Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन संघात ‘या’ दोन फास्ट बॉलर्सची एंट्री, दोघेही करतात वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी
भारताला हरवल्यावर बांगलादेशच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,’आम्हाला वाटलं होत..’