न्यूझीलंडचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील पहिला कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव संपून इंग्लंडने अर्ध्याहून जास्त विकेट्स गमावल्या. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांनी लॉर्ड्सच्या खेळपट्टीविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ 1st Test) यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात तब्बल १७ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. खेळपट्टीवर गोलंदाजांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. डोडा गणेश (Dodda Ganesh) यांच्या मते ही खेळपट्टी लॉर्ड्स स्टेडियमची (Lord’s Cricket Stadium) असल्यामुळे चाहते प्रश्न उपस्थित करत नाहीयेत. मात्र, जर अशी परिस्थिती भारतातील मैदानात झाली असती, तर मात्र मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले गेले असते.
दरम्यान, २०२०मध्ये जेव्हा इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी भारतीय खेळपट्टीवर टीका केली होती. त्यावेळी भारतीय खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होती आणि इंग्लंडची अवस्थ बिकट झाली होती. अशातच आता इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याच्या पहिल्याच दिवशी १७ विकेट्स पडल्यानंतर डोडा गणेश देखील हैराण झाले आहेत. त्यांनी याविषयी ट्वीट करून महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, “जर भारतातील कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी १७ विकेट्स पडल्या असत्या, तर विवादांचा डोंगर उभा झाला असता.”
https://twitter.com/doddaganesha/status/1532414636687249409?s=20&t=5dVCJ93JBNTSjjLXuqd-EQ
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडचा नवीन कर्णधार आणि प्रशिक्षकाची जोडी लाभली आहे. बेन स्टोक्स पहिल्यांचा इंग्लंड संघाचा कर्णधार बनला आहे, तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंड कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. इंग्लंडचा संघ मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीये. अशात मॅक्युलम आणि स्टोक्स यांच्यावर संघाला पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये घेऊन येण्याची जबाबदारी आहे.
उभय संघातील या पहिल्या सामन्याचा विचार केला, तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्सने प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. न्यूझीलंड पहिल्या डावात अवघ्या १३२ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ विकेट्सच्या नुकसानावर ११६ धावा केल्या केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडनेही अवघ्या १४१ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडच्या टीम साउदीने ४, तर ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हनीमूनला जातोय, पण ‘या’ गोष्टीची काळजी घे, नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या चाहरला बहिणीचा सल्ला