भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (७ ऑगस्ट) इंग्लंड संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. इंग्लंड संघाचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. या डावात जॉनी बेअरस्टोला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने भन्नाट सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटसोबत मिळून जॉनी बेअरस्टोने महत्वपूर्ण भागीदारी करत इंग्लंड संघाला आघाडी मिळवून दिली होती. हे दोघे फलंदाजी करत असताना इंग्लंड संघाचे धावफलक वेगाने पुढे जात होते. त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ लागली होती. त्यावेळी कर्णधार कोहलीने मोहम्मद सिराजला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले होते. (After taking Jonny Bairstow wicket, mohammad siraj celebration went Viral on social media)
भारतीय संघाकडून ५८ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला आणि तो जडेजाच्या हातून झेल बाद होऊन माघारी परतला. सिराजला जेव्हा कळाले की, जडेजाने हा झेल टिपला आहे. तेव्हा सिराजने याचा जोरदार जल्लोष साजरा केला. त्याने आपल्या तोंडावर बोट ठेऊन बेअरस्टोला तोंड बंद ठेवण्याचा इशारा केला.
हे पाहून बेअरस्टोलाही विश्वास होत नव्हता की, तो बाद झाला आहे. सिराजचा हा जल्लोष पाहून संघातील खेळाडूंचा पुन्हा एकदा उत्साह वाढला होता.
#Siraj removed #Bairstow! 🤫
Come on #TeamIndia 👏👏👏#ENGvIND #ENGvsIND #INDvENG #INDvsENG #cricketpic.twitter.com/U2RnHFJUMI— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) August 7, 2021
भारतीय संघाला विजयासाठी १५७ धावांची आवश्यकता
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५७ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर (७ ऑगस्ट) भारतीय संघाच्या धावा १ गडी बाद ५२ होत्या. यामध्ये केएल राहुल २६ धावा करत माघारी परतला आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२-१२ धावा करून मैदानावर टिकून आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांचेच लक्ष भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर टिकून असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
संघ सहकाऱ्याचा डिविलियर्सवर गंभीर आरोप; म्हणाला, ‘तो माझा हिरो होता, पण त्याने माझ्यासोबतच…’
एक षटक, ५ षटकार; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांने सर्वात अनुभवी बांगलादेशी गोलंदाजाची काढली पिसं
वाचलंत का? उर्वरित आयपीएल हंगामासाठी खूप कठोर आहेत ‘कोरोना प्रोटोकॉल’, चूकल्यास कारवाईही होणार