---Advertisement---

‘अरे मी रिषभ पंत आहे…’, बस ड्रायव्हरने सांगितला घडला प्रकार, क्रिकेटपटूने स्वतः करून दिली ओळख

On: शुक्रवार, डिसेंबर 30, 2022 7:32 PM
rishabh pant
---Advertisement---

रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंबर) सकाळी झालेला अपघात क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक घटना आहे. पहाटेच्या वेळी घरी आईला भेटण्यासाठी जात असताना पंतची गाडी उत्तराखंडच्या रुरकीजवळ अपघातग्रस्त झाली. अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली असून गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने गाडी पेट घेण्याआधी पंतने बाहेर उडी मारली. अपघातानंतर एक बस ड्रायव्हर सुनील कुमार सर्वात आधी पंतच्या जवळ पोहोचले आणि त्यांनी त्याला मदत देखील केली.

गाडीचा अपघात भीषण असला, तरी अपघातानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) शुद्धीत होता. पण त्याला झालेली इजा ही मोठ्या प्रमाणात होती. बस ड्रायव्हर सुनील कुमार (Sunil Kumar) त्याच्या जवळ पोहोचल्यानंतर पंतने स्वतः त्याची ओळख सांगितल्याचेही सुनील यांनी सांगितले. रिषभ त्याची मर्सिडीज गाडी स्वतः चालवत असून घरी दिल्लीवरून घराकडे म्हणजेच रुरकीकडे चालला होता. वाटेत पहाटेच्या वेळी त्याला झोप आली आणि हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. सुनील कुमारांनी दिलेल्या माहिती नुसार जखमी अवस्थेत पंत त्यांना म्हणाला की, “मी क्रिकेटपटू रिषभ पंत आहे.”

अपघातानंतर पंतला जवळच्या रुग्णालयात नेऊन जखमांवर  उपचार केले गेले. सथ्या तो डेहराडूनच्या मॅक्स हॅस्पिटलमध्ये आहे. याठिकाणी त्याच्यावर सिटिस्कॅन केला जेगा असून अहवाल आल्यानंतर उपचाराची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पंतच्या चांगल्या आरोग्यासाठी क्रिकेटविश्वासह सर्वच श्रेत्रातील दिग्गजांनी प्रार्थना केली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार पंतची दुखापत एवढी गंभीर आहे की, पुढचे किमाम एक वर्ष तो पूर्णपणे फिट होऊ शकणार नाही. त्याच्या पाठीला, पायाला घोटे आणि गुडघ्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. अशात संघात पुनरागमन करण्यासाठी पंतला मोठा काळ लागणार आहे. जानेवारी महिन्यात भारत आणि श्रीलंका संघात होणाऱ्या टी-20 आणि वनेड मालिकेत पंत खेळणार नव्हता. पण फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंत मॅच विनर ठरू शकत होता. तसेच यावर्षी भारत खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकात देखील त्याच्या खेळण्याविषयी संशय व्यक्त होत आहे.  (After the accident, Rishabh Pant was talking and also mentioned his own name)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: डिवायडरला धडकून हवेत उडाली कार! रिषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---