केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेचा 7 विकेट्स राखून दारून पराभव केला. या विजयासोबत भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारतीय संघ केपटाऊन कसोटीआधी गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर होता. गुरुवारी (4 जानेवारी) मिळालेल्या विजयानंतर संघाने थेट पहिला क्रमांक गाठला.
केपटाऊनमधील कसोटी सामना खेळण्याआधी दक्षिण आफ्रिका संघ डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. पण भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला. पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताने डब्ल्यूटीसीच्या चालू हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यात 2 विजय मिळवले आहे. एका सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
गुणतालिकेत भारताकडे एकूण 54.56 गुण आहेत आणि संघ पहिल्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड, चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, तर पाचव्या क्रमांकावर बांगलादेश आहे. या चारही संघांकडे प्रत्येकी 50 गुण आहेत. यादीत सहावा क्रमांक पाकिस्तान (45.83 गुण), सातवा वेस्ट इंडीज (16.67 गुण), आठवा क्रमांक इंग्लंड (15.00 गुण) आणि नववा क्रमांक श्रीलंकेचा (0.00 गुण) आहे.
भारताने आफ्रिकेला सहज नमवले
केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी शेवटच्या डावात भारताला दक्षिण आफ्रिकेडून 79 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाने अवघ्या 12 षटकांत 3 विकेट्सच्या नुकसानावर ले लक्ष्य गाठले. भारताकडून यशस्वी जयसवाल याने ताबडतोड फलंदाजी करत 23 चेंडूत 28 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्मा 17 धावांवर नाबाद राहीला. तत्पूर्वी भारतीय वेगवान गोलंदाजांनी या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत आफ्रिकन फलंदाजीची कंबर मोडली. सामनावीर ठरलेल्या मोहम्मद सिराज याने सामन्यात 7 तर बुमराहने 8 विकेट्स घेत महत्वाची भूमिका पार पाडली.
आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व
दरम्यान, या सामन्यातील प्रदर्शनानंतर आयसीसी क्रमवारीत भारताचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय संघ टी-20 आणि वनडे मध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दूसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताने पहिल्या क्रमांकावर झेप घेत आणखी एक पराक्रम केला. याआधी भारतीय संघ मागच्या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानावर पोहोचला होता. (After the victory in the Cape Town Test, the Indian team reached the first position in the points table of the World Test Championship)
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! एमएस धोनीला मित्रांनीच लावला कोट्यावधी रुपयांचा चुना, सीएसके कर्णधाराने ठोकली केस
‘डोकं लावत आहात…’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितचं मजेशीर उत्तर, पुन्हा लुटली मैफील