दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा केपटाऊन कसोटी सामना जिंकून भारताने दोन सामन्यांची ही कसोटी मालिका बरोबरीत सोडवली. भारताला जिंकण्यासाठी शेवटच्या डावात अवघ्या 79 धावांचे लक्ष्य मिळाले होते. अवघ्या 12 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर भारताने गे लक्ष्य गाठले आणि मालिका बरोबरीत सोडवली. भारताला विजय मिळाला असला, तरी कर्णधार रोहित शर्मा केपटाऊनच्या खेळपट्टीवर नाराज दिसला.
केटाऊनमध्ये खेळला गेलला हा कसोटी सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहिसात निकाली निघालेला सर्वात छोटा सामना ठरला. अवघ्या 642 चेंडूंचा खेळ या सामन्यात झाला. मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात ऍडेन मार्करम या एकट्याने शतकी खेळी केली. त्याव्यतिरिक्त चारही डावांमध्ये एकही फलंदाजा अर्धशतक करू शकला नाही. केपटाऊनची खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजीसाठी बनलेली होती. फलंदाजांना याठिकाणी धावा करताना चांगलीच कसरत करावी लागली. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्मा याने भारतीय खेळपट्टीवर नेहमी टीका करणाऱ्यावर निशाणा साधला.
सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, “केपटाऊनची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी आदर्श नव्हती. जोपर्यंत भारतीय खेळपट्टीवर टीका केली जात नाही, तोपर्यंत मला अशा खेळपट्टीवर खेळताना काहीच अडचण नाही. पण भारतातील फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर टीका केली जाते. इतकेच नाही, विश्वचषकाच्या अंतिम सामना खेळला गेला, त्या खेळपट्टीवरही प्रश्न उपस्थित केले गेले. आयसीसीने याकडे लक्ष दिले पाहिजे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघ अवघ्या 55 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 153 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका संघ 176 धावांपर्यंत मजल मारू शकला. तर भारताने विजयासाठी मिळालेले 79 धावांचे लक्ष्य 7 विकेट्स राखून गाठले. (After the victory, Indian team captain Rohit Sharma expressed his displeasure at the Cape Town Test pitch)
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास, आजपर्यंतचे विजेते आणि मुंबई-महाराष्ट्र-विदर्भ संघाची कामगिरी
केपटाऊन कोसटी जिंकण्यासाठी भारताला 79 धावांचे लक्ष्य, फलंदाज रबाडा आणि लुंगी एनगिडीला उत्तर देण्याच्या तयारीत