भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेस चॅलेंजचा स्विकार करणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच महागात पडलेल दिसत आहे. कारण हे चॅलेंज स्विकारताच काॅंग्रेसअध्यक्ष राहुल गांधींनी त्यांना फ्युयल चॅलेंज दिले आहे.
तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करा आणि फ्युयल चॅलेंज स्विकारा नाहीतर काॅग्रेस संपुर्ण देशभर आंदोलन करेल असे गांधी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Dear PM,
Glad to see you accept the @imVkohli fitness challenge. Here’s one from me:
Reduce Fuel prices or the Congress will do a nationwide agitation and force you to do so.
I look forward to your response.#FuelChallenge
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2018
सध्या देशात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्याला अनुसरुनच राहुल गांधी यांनी हा टायमिंग साधल्याचा बोललं जात आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटला ३ तासात चक्क ९ हजार रिट्विट आले आहेत.
केंद्रिय क्रिडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून ‘हम फिट तो इंडिया फिट’ ही मोहीम सुरू केली आहे.
त्यानुसार काल भारताचा कर्णधार विराट कोहलीने सरकारच्या फिटनेस चॅलेंजचा भाग म्हणून त्याच्या फिटनेसचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.
I have accepted the #FitnessChallenge by @ra_THORe sir. Now I would like to challenge my wife @AnushkaSharma , our PM @narendramodi ji and @msdhoni Bhai for the same. 😀 #HumFitTohIndiaFit #ComeOutAndPlay pic.twitter.com/e9BAToE6bg
— Virat Kohli (@imVkohli) May 23, 2018
यात त्याने त्याची पत्नी अनुष्का शर्मा, एमएस धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते.
त्याला प्रतिसाद देताना मोदींनी ट्विट करून विराटचं चॅलेंज स्विकारले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की मी लवकरच माझा फिटनेस चॅलेंजचा व्हिडिओ शेअर करेल.
Challenge accepted, Virat! I will be sharing my own #FitnessChallenge video soon. @imVkohli #HumFitTohIndiaFit https://t.co/qdc1JabCYb
— Narendra Modi (@narendramodi) May 24, 2018
विराटबरोबरच क्रिडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी 2012ची आॅल्मपिक पदक विजेती सायना नेहवाल आणि अभिनेता हृतिक रोशनलाही हे फिटनेस चॅलेंज दिले होते.
Post pictures and videos of how you keep yourself fit and send a #FitnessChallenge to your friends on social media. Here's my video 😀and I challenge @iHrithik, @imVkohli & @NSaina to join in🥊 pic.twitter.com/pYhRY1lNEm
— Col Rajyavardhan Rathore (Modi Ka Parivar) (@Ra_THORe) May 22, 2018
राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या या मोहीमेला अनेक सेलिब्रेटींनी प्रतिसाद दिला आहे. यात बॅडमिंटनस्टार सायना नेहवाल, कुस्तीपटू बबीता फोगट, पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी, अभिनेते, मनोज तिवारी, सलमान खान, टायगर श्रॉफ अशा अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे फिटनेस चॅलेंजचे व्हिडिओ ट्विटरवर शेओर केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!
-विराट कोहलीच्या काउंटी पदार्पणावर प्रश्नचिन्ह
-कोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू
–सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!
-आयपीएल 2018 मध्ये या 6 खेळाडूंची आहे गोलंदाजांमध्ये दहशत
-सचिन, रोहितनंतर मोठा पराक्रम करण्याची संधी मुंबईकर रहाणेकडून हुकली!
-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!