---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर ‘गुरु’ द्रविडसह कर्णधार, उपकर्णधाराची खास मेजवाणी, फोटो भन्नाट व्हायरल

---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यावर मंगळवारी (20 जुलै) भारत आणि श्रीलंका संघामध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात आला. या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने तीन विकेट्सने श्रीलंका संघाला पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार 23 जुलै रोजी कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबर जेवायला गेलेले दिसले.

प्रशिक्षक द्रविडसह खेळाडू गेले रात्रीच्या जेवणाला
श्रीलंका संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत आघाडी मिळवल्यानंतर भारतीय संघातील काही खेळाडू हॉटेलमध्ये मस्ती करताना दिसून आले होते. तर आता भारतीय संघातील काही खेळाडू प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत रात्रीचे जेवण करताना दिसून आले. श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपद दिलेला शिखर धवनने इंस्टाग्रामवर द्रविडबरोबर जेवण करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

कर्णधाराने फोटो केले शेअर
या फोटोत प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूरसुद्धा दिसत आहेत. फोटो शेअर करताना शिखर धवन म्हणाला की, ‘ही खूपच चांगली संध्याकाळ आहे.’  श्रीलंका दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर कर्णधार आहे, तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार आहे.

https://www.instagram.com/p/CRmNizvqfZ9/

भारताने मालिका जिंकली
दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 3 गडी राखून पराभूत केले. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी 8 व्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी केली आणि गमावलेला सामना भारताच्या पारड्यात टाकला. चाहर आणि भुवनेश्वर यांच्या भागीदारीमुळेच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंका संघाला 7 गडी राखून पराभूत केले होते.

चाहर आणि भुवनेश्वर यांनी विजय मिळवून दिला
दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघ विजयाच्या मार्गावर होता, परंतु चाहर आणि भुवनेश्वरने फलंदाजीद्वारे चमत्कार करून त्यांच्याकडून विजय खेचला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला 276 धावांचे लक्ष्य दिले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 193 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, त्यानंतर दीपक आणि भुवनेश्वर यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करून सामना जिंकला.

द्रविड यांना प्रशिक्षक बनविण्याची मागणी
श्रीलंका दौर्‍यासाठी राहुल द्रविडला भारताच्या एकदिवसीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, कारण रवि शास्त्री विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी संघासह इंग्लंड दौर्‍यावर आहेत. भारत आणि इंग्लंड संघात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंकेमध्ये भारताच्या एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर रवि शास्त्री यांच्या ऐवजी नियमित मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची नियुक्त करण्याची मागणी आहे.

2021 टी20 विश्व चषकपर्यंत शास्त्री यांचा कार्यकाळ
भारताचे दोन संघ सध्या वेगवेगळ्या देशांच्या दौर्‍यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर आहे, तर शिखर धवनाच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या संघासह श्रीलंका दौर्‍यावर आहेत. राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघासोबत आहेत. द्रविडला भारताचा प्रशिक्षक बनविण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे टी20 विश्वचषकानंतर रवि शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे.

द्रविडला प्रशिक्षक होण्याची उत्तम संधी 
जर श्रीलंका दौर्‍यावर एकदिवसीय आणि टी20 मालिकेमध्ये भारतीय संघ श्रीलंका संघाला क्लीन स्वीप करण्यात यशस्वी ठरला, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ रवि शास्त्रीचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून विचार करु शकते.  द्रविडने यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील आणि भारत अ संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

महत्त्वाच्या बाकम्या – 

भारताच्या केवळ २० खेळाडूंना मिळाली ऑलिम्पिक उद्घाटनात सहभागी होण्याची परवानगी, हे असतील ध्वजवाहक

दोस्त दोस्त ना रहा! सराव सामन्यात सुंदरला बाद केल्यानंतर सिराजने केली स्लेजिंग; व्हिडिओ जोरदार व्हायरल

उद्या पार पाडणार टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ; कमीत कमी भारतीय खेळाडू होणार सहभागी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---